फ्लिपकार्ट आणि उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (DPIIT) संयुक्त विद्यमाने एक कार्यशाळा आयोजित केली होती.
जागतिक खेळणी उद्योगातील सप्लाय चेन क्षेत्रात भारताचे स्थान उंचावण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
संपूर्ण भारतातून शेकडो खेळणी उत्पादकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला, या उपक्रमामुळे भारतीय खेळण्यांच्या उद्योगात वाढीचे एक नवीन पर्व सुरू होईल.
दिल्ली जून २०२४ – भारताची ओळख ‘टॉय एक्सपोर्ट हब’ अशी करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने एक कार्यशाळा आयोजित केली होती. जागतिक पातळीवर खेळण्यांच्या सप्लाय चेन क्षेत्रात भारताची क्षमता वाढवणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. भारतातल्या श्रीमंत, समृद्ध संस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करणारी उच्च दर्जाची खेळणी तयार करणे आणि स्थानिक उत्पादकांच्या कौशल्याचा विकास करणे या मुद्यांवर कार्यशाळेत भर दिला गेला.
खेळणी उत्पादन क्षेत्रात भारताचे स्थान उंचावण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. खेळण्यांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा (NAPT) हा त्यातलाच एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय खेळणी उद्योगाचा दर्जा वाढवणे, तंत्रज्ञानाचा विकास आणि बाजारपेठेचा विस्तार या उद्दिष्टांचा समावेश आहे.
या कार्यशाळेत हजारो खेळणी उत्पादकांनी सहभाग घेतला. फ्लिपकार्टच्या तज्ज्ञ मंडळींबरोबर संवादात्मक चर्चा केली. खेळण्यांचा दर्जा वाढवणे, संशोधन आणि उद्योगाच्या मानकांचे पालन करणे, या मुद्द्यांवर ही चर्चा झाली. उत्पादकांना त्यांचा ऑनलाइन बिझनेस वाढवता यावा यासाठी माहिती , साधनं आणि वेगवेगळे टूल्स देणे हाही या कार्यशाळेचा उद्देश होता.
या कार्यशाळेला डीपीआयआयटी चे सचिव राजेश कुमार सिंग, सहसचिव श्री संजीव, संचालक मोहम्मद इशरार अली, फ्लिपकार्ट चे चीफ कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर रजनीश कुमार, फ्लिपकार्टच्या एफएमसीजी आणि जनरल मर्चंटाइज विभागाचे प्रमुख मंजरी सिंगल उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशाबद्दल बोलताना डीपीआआयटीचे सचिव राजेश कुमार सिंग म्हणाले, “भारतातील खेळण्यांच्या उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फ्लिपकार्ट सारख्या संस्थेबरोबर भागीदारी करून उच्च दर्जाच्या खेळण्यांच्या क्षेत्रात भारत आघाडीचा निर्यातदार व्हावा यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं उचलत आहोत. योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला तर खेळणी उत्पादक क्षेत्रात भारत अग्रेसर होऊ शकतो.”
फ्लिपकार्ट से चीफ कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर रजनीश कुमार म्हणाले, “फ्लिपकार्ट च्या माध्यमातून आम्ही स्थानिक खेळणी उत्पादकांना एक प्लॅटफॉर्म देऊन भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत केली आहे. भारतातील खेळणी उद्योगाचा विकास करणे आणि जागतिक पातळीवर खेळण्याचा आघाडीचा म्हणून भारताला समोर आणणे या वाणिज्य मंत्रालय आणि डीपीआयआयटीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही हातभार लावतोय याचा आम्हाला आनंद आहे. या कार्यशाळेमुळे सर्व भागधारकांना भविष्यातल्या संधी ओळखता येतील आणि सरकारचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होईल.
डीपीआयआयटी आणि फ्लिपकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा उद्देश भारतीय खेळणी उद्योगाचा विकास करणे हा होता. खेळण्यांचा दर्जा वाढणे, संशोधन, उद्योग क्षेत्रातील मानकांशी साधर्म्य साधणे आणि त्याला इ-कॉमर्सची जोड देणे हाही या कार्यशाळेचा उद्देश होता.
या कार्यशाळेमुळे नवीन उत्पादकांना नोंदणी, अकाउंट सेटअप करण्यासाठी मदत, पर्सनलाईज्ड अकाउंट मॅनेजमेंट, योग्य भावासाठी सेलर सपोर्ट अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध होतील. फ्लिपकार्टच्या डेटा अनालिटिक्सचा वापर करून खेळणी उत्पादकांना ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रेक्षकांपर्यंत मोठ्या पोहोचण्यास मदत होईल. सध्या अनेक खेळणी उत्पादक फ्लिपकार्टच्या व्यासपीठाचा वापर करत आहे. या भागीदारीमुळे उद्योग वाढीचा एक नवा काळ भारतीय खेळणी उद्योगासाठी उदयाला येईल.
भारतातील खेळणी उत्पादकांच्या सशक्तीकरणासाठी आणि जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी फ्लिपकार्ट आणि डीपीआयायटी आले एकत्र
RELATED ARTICLES


