अहमदाबाद, 17 जून 2024: सर्वांसाठी चांगले आरोग्य राखण्यासाठी समर्पित असलेल्या अहमदाबाद स्थित कोरोना रेमेडीज या फार्मास्युटिकल कंपनीने, एकाच आठवड्यात बायोथेसिओमीटर वापरून पेरिफेरल न्यूरोपॅथीसाठी सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्याचा एशियातील रेकॉर्ड स्थापित केला आहे.
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सद्वारे मान्यताप्राप्त, ही उल्लेखनीय कामगिरी 5 ते 11 मे 2024 या कालावधीत पार पडली, जी जागतिक स्तरावर न्यूरोपॅथी अवेअरनेस वीक म्हणून साजरी केली जाते. ही उपलब्धी आरोग्य जागरुकतेचे महत्त्व अधोरेखित करते आणि समन्वित आरोग्य प्रयत्नांच्या परिणामावर प्रकाश टाकते.
कोरोना रेमेडीजच्या टीमने न्यूरोपॅथी अवेअरनेस वीक दरम्यान न्यूरोपॅथी तपासणी शिबिरांमध्ये 1,231 डॉक्टरांच्या मदतीने संपूर्ण भारतभरातील 21,012 रुग्णांची तपासणी केली. हा उपक्रम कंपनीच्या “मिशन हील इंडिया” उपक्रमाचा एक भाग होता. यामध्ये स्थानिक आरोग्य सेवा प्रदाते, दवाखाने आणि हॉस्पिटल्स आणि शहरी केंद्रांमधील समुदाय नेते, ग्रामीण गावे आणि दुर्गम भाग यांच्या सहकार्याचा समावेश होता.
श्री नीरव के. मेहता, प्रमोटर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कोरोना रेमेडीज म्हणाले, “हा उपक्रम जागरूकता वाढवण्याबद्दल आणि जे शांतपणे चुपचाप त्रास सहन करतात अश्या हजारो लोकांना लवकर उपचार देण्याबद्दल आहे. पेरिफेरल न्यूरोपॅथी जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकते. अधिकाधिक रुग्णांना या स्थितीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने आम्ही वर्षभर नियमितपणे पेरिफेरल न्यूरोपॅथीची तपासणी करण्यासाठी समर्पित आहोत. व्यापक वैद्यकीय समुदायाच्या सहकार्याने ‘मिशन हील इंडिया’च्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे.”
पेरिफेरल न्यूरोपॅथी जागतिक स्तरावर लाखो लोकांना प्रभावित करते, विशेषत: ज्यांना मधुमेह, एंडोक्राइन डिसऑर्डर किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. न्यूरोपॅथीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये शाकाहारी आहार, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, जास्त अल्कोहोल सेवन, विषारी पदार्थांचा संपर्क, काही औषधांचे दुष्परिणाम आणि अनुवांशिक विकार यांचा समावेश होतो.
प्रभावी व्यवस्थापनासाठी लवकर तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे, विशेषत: मधुमेही रूग्णांमध्ये, कारण अशा रूग्णांपैकी 50% रुग्णांमध्ये न्यूरोपॅथीची लक्षणे नसतात. वेळेवर उपचार न केल्यास, या स्थितीमुळे पायाच्या अल्सरसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात, ज्यामुळे अंगविच्छेदनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जागरूकता वाढवण्याबरोबरच, या अनोख्या उपक्रमाने आजाराबाबत मौल्यवान माहितीही दिली आहे. एक उल्लेखनीय निष्कर्ष असा आहे की इतरांच्या तुलनेत मधुमेहाच्या रूग्णांमध्ये गंभीर न्यूरोपॅथीचे प्रमाण 2.67 पट आणि मध्यम न्यूरोपॅथीचे प्रमाण 2.56 पट जास्त आहे.
एशियाई देशांसाठी एक प्रमुख रेकॉर्ड ठेवणारा, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड,वर्ल्ड रेकॉर्ड युनियन अंतर्गत कार्य करते. हे व्हिएतनाम, नेपाळ, कंबोडिया, भारत, इंडो-चीन, बांग्लादेश, यूएस, युक्रेन बुक आणि इंडोनेशियामधील विविध राष्ट्रीय रेकॉर्ड बुकच्या संयोगाने काम करते. त्याचे मुख्यालय भारत आणि व्हिएतनाममध्ये आहे.


