Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडला आयपीओसाठी सेबीची परवानगी

एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडला आयपीओसाठी सेबीची परवानगी

एमक्युअर फार्मास्युटिकल्सला आयपीओ लाँच करण्यासाठी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“SEBI”) ची मंजुरी मिळाली आहे.

कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“SEBI”) कडे दाखल केला होता.

गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या ताज्या मसुद्यानुसार, आयपीओमध्ये 800 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्सचे जारी करणे आणि प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे 1.36 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर ऑफ सेल (OFS) अशा गोष्टींचा समावेश आहे.

ताज्या इश्यूची रक्कम कर्जाच्या पेमेंटसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.

एमक्युअर फार्मास्युटिकल्स ही अनेक प्रमुख उपचारात्मक क्षेत्रांमध्ये फार्मास्युटिकल उत्पादनांची विस्तृत श्रेणी विकसित करणे, उत्पादन करणे आणि जागतिक स्तरावर विपणन करण्यात गुंतलेली अग्रगण्य भारतीय फार्मास्युटिकल्स कंपनी आहे. ही कंपनी संशोधन आणि विकास (“R&D”) चालित कंपनी आहे ज्यात एक भिन्न उत्पादन पोर्टफोलिओ आहेत ज्यामध्ये ओरल, इंजेक्टेबल्स आणि बायोथेरप्यूटिक्सचा समावेश आहे. यामुळे त्यांची भारत, आणि कॅनडा तसेच युरोपमध्ये मजबूत उपस्थिती असून, 70 पेक्षा जास्त देशांमधील बाजारपेठांपर्यंत कंपनीला पोहोचता आले आहे..

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेफरीज इंडिया, ॲक्सिस कॅपिटल आणि जेपी मॉर्गन इंडिया या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments