Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेटाकडून डिजिटल सुरक्षितता उपक्रमांबाबत चर्चा करण्‍यासाठी पुण्‍यामध्‍ये पालक, शिक्षकांसोबत 'डिजिटल सुरक्षा फॉर...

मेटाकडून डिजिटल सुरक्षितता उपक्रमांबाबत चर्चा करण्‍यासाठी पुण्‍यामध्‍ये पालक, शिक्षकांसोबत ‘डिजिटल सुरक्षा फॉर टीन्‍स’ गोलमेज परिषदेचे आयोजन

पुणे, जून २१, २०२४: तरूणांच्‍या कल्‍याणाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत मेटाने आज १एम१बी सोबत सहयोगाने पुण्‍यामध्‍ये ‘टॉकिंग डिजिटल सुरक्षा फॉर टीन्‍स’ गोलमेज परिषदेचे आयोजन केले. मेटाच्‍या ऑनलाइन सुरक्षिततेसंदर्भात दृष्टिकोनाबाबत पालकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी आणि ऑनलाइन विश्‍वाशी संलग्‍न असलेल्‍या किशोरवयीनच्‍या सुरक्षिततेकरिता सर्वोत्तम पद्धतींबाबत माहिती देण्‍यासाठी पॅरेंट-एज्‍युकेटर फोरमचे आयोजन करण्‍यात आले.

या चर्चासत्रामध्‍ये पालकांना त्‍यांच्‍या किेशोरवयीन मुलांच्‍या मेटाच्‍या प्‍लॅटफॉर्म्‍ससह स्‍मार्टफोन्‍स व डिवाईसेसच्‍या वापरावर आत्‍मविश्‍वासाने नियंत्रण ठेवण्‍यास सक्षम करण्याच्‍या पद्धतींबाबत चर्चा करण्‍यात आली, तसेच पालक व शिक्षकांकडून किशोरवयीनांच्‍या सोशल मीडिया व इतर ऑनलाइन ट्रेण्‍ड्सच्‍या वापराबाबत अभिप्राय गोळा करण्‍यात आले. या गोलमेज परिषदेला शहरातील १० ते १५ निवडक शाळांमधील शिक्षक व पालकांचा निवडक समूह उपस्थित होता, ज्‍यांनी डिजिटल सुरक्षितता उपक्रमांबाबत माहिती मिळवण्‍यासोबत त्‍यांच्‍या किेशोरवयीन मुलांच्‍या सोशल मीडिया प्रवासाच्‍या अनुभवांबाबत चर्चा केली. मेटाने उपस्थित पालक व शिक्षकांना सुरक्षित सोशल मीडिया अनुभवासंदर्भात साह्य करू शकणारे मेटाचे टूल्‍स व वैशिष्‍ट्यांबाबत देखील माहिती दिली.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत इन्‍स्‍टाग्रामच्‍या भारतातील पब्लिक पॉलिसीच्‍या संचालक नताशा जोग म्‍हणाल्‍या, ”आमचा विश्‍वास आहे की, पालक व‍ शिक्षक किशोरवयीनांच्‍या सोशल मीडिया प्रवासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारतभरात उच्‍च प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करत आम्‍ही पालक व शिक्षकांना त्‍यांचे किशोरवयीन मुले सुरक्षित राहत अर्थपूर्णपणे ऑनलाइन कशाप्रकारे वेळ व्‍यतित करू शकतात, याबाबत जागरूक करत आहोत.”

युजर सेफ्टी इकोसिस्‍टम प्रबळ करण्‍यासाठी सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून मेटाने गेल्‍या वर्षी ‘डिजिटल सुरक्षा समिट’चे आयोजन केले, जो तरूणांना व महिलांना सुरक्षित आणि संतुलित ऑनलाइन अनुभव देण्‍यासाठी सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नावर डिझाइन करण्‍यात आला होता. मेटाने शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना आणि शिक्षकांना ऑनलाइन सुरक्षितता व डिजिटल नागरिकत्‍वाबाबत माहिती, जागरूकता व शिक्षणासह सक्षम करण्‍यासाठी डिपार्टमेंट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, बायोटेक्‍नॉलॉजी अँड सायन्‍स अँड टेक्‍नॉलॉजी (आयटीबीटी), कर्नाटक सरकारसोबत दोन वर्षाच्‍या सहयोगाची देखील घोषणा केली आहे.

गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये मेटाने ऑनलाइन सुरक्षिततेला चालना देण्‍यासाठी ५० हून अधिक सेफ्टी टूल्‍स लाँच केले आहेत. नुकतेच, किेशोरवयीन सुरक्षिततेसंदर्भात वैशिष्‍ट्ये लाँच केली, जसे ‘नाइट नजेस्’ जे वापरकर्त्‍यांना रात्री उशिरापर्यंत इन्‍स्‍टाग्राम अॅप वापरत असल्‍यास बंद करण्‍यास प्रेरित करते, तसेच ‘क्‍वाइट मोड’, जे किशोरवयीन वापरकर्त्‍यांना इन्‍स्‍टाग्रामवर व्‍यतित करणाऱ्या वेळेवर आणि पाहणाऱ्या कन्‍टेन्‍टवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करते. इन्‍स्‍टाग्रामच्‍या पॅरेण्‍टल सुपरहिव्‍हजन फिचर सह पालक त्‍यांची मुले फॉलो करणारे अकाऊंट्स, मुलांना फॉलो करणारे अकाऊंट्स पाहू शकतात आणि त्‍यांच्‍या ऑनलाइन अनुभवांबाबत अधिक माहिती मिळवू शकतात. मेटाचे ‘फॅमिली सेंटर’ पालकांना व किशोरवयीन मुलांना प्‍लॅटफॉर्म्‍स सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्‍याबाबत माहिती देखील देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments