Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedखडकी रेंज हिल्स येथील दोन्ही अंडरपास जवळील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आमदार...

खडकी रेंज हिल्स येथील दोन्ही अंडरपास जवळील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आमदार सिद्धार्थ शिरोळे ; खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, पुणे मनपा अधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

पुणे : खडकी रेंज हिल्स येथील दोन्ही अंडरपास जवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच सुटणार असून त्याबाबत त्वरित ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन व पुणे मनपा अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये पुढील कार्यवाही बाबत चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ, रेल्वेचे डीआरएम, पुणे मनपा मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला तसेच डिफेन्स इस्टेट ऑफिसर आणि अम्युनिशन फॅक्टरी खडकी चे अधिकारी आदी उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. येथील अंडरपासची रुंदी ६ मीटर असून ती भविष्यात १८ मीटरपर्यंत वाढविण्यात येईल. प्रथमतः यावर उभारण्यात येणाऱ्या पुलाकरिता जनरल अरेंजमेंट ड्रॉईंग (जीएडी) तयार करण्यात येणार आहे. हे ड्रॉईंग रेल्वे प्रशासनाकडून कडून तयार करण्यात येणार आहे आणि या कामाकरिता लागणारा निधी पुणे मनपाकडून वितरीत करण्यात येणार आहे.

याबाबत लागणाऱ्या परवानग्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि रेल्वे बोर्ड येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये घेणार आहे. पुलाचे काम चार महिन्यानंतर सुरु होणार असून रेल्वे ओव्हरब्रिज चे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येईल. तसेच तेथील रस्ते किंवा इतर पायाभूत सुविधा या पुणे मनपातर्फे करण्यात येणार आहेत. याशिवाय अम्युनेशन फॅक्टरी खडकी च्या अंतर्गत असलेल्या जागेसंबंधी परवानग्या मिळाल्यानंतर जून २०२५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments