Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (एफएफपीएल) ऑटोमोबाइल आणि ऑटो ऐन्सिलरी क्षेत्रातील ‘ब्रँड...

फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (एफएफपीएल) ऑटोमोबाइल आणि ऑटो ऐन्सिलरी क्षेत्रातील ‘ब्रँड ऑफ द इयर २०२४’ सन्मान

पुणे, जून २०२४ – पुणे स्थित फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. या वाहन उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या फिल्ट्रेशन उत्पादन आणि सुविधा उत्पादक कंपनीला, वाहन आणि वाहनाचे सहायक भाग (ऑटोमोबाइल आणि ऑटो ऐन्सिलरी) या विभागात प्रतिष्ठित ‘ब्रँड ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला. २१ जून २०२४ रोजी दिल्लीत झालेल्या मार्क्समेन डेली इव्हेंटमध्ये हा सन्मान कंपनीला प्रदान करण्यात आला.

 

 

 

हा पुरस्कार वैविध्यपूर्ण व्यावसायिक क्षेत्रांत गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्यासाठी दिला जातो. यंदाच्या पुरस्काराने फ्लीटगार्ड फिल्टर्सच्या वाहन उद्योगातील लक्षणीय योगदानाची दखल घेतली आहे. या पुरस्कारामुळे कंपनीच्या आधुनिक फिल्ट्रेशन तंत्रज्ञानाने घडलेल्या महत्त्वपूर्ण बाजार परिणामाचे अधोरेखन झाले आहे.

 

 

 

फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एफएफपीएल) कंपनीने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘मार्क्समेन डेलीने आम्हाला ‘ब्रँड ऑफ द इयर 2024’ म्हणून ओळख दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. या पुरस्काराने आमच्या संपूर्ण टीमची मेहनत व चिकाटी अधोरेखित झाली आहे. यामुळे आम्हाला सातत्याने नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यासाठी तसेच ग्राहकांना तांत्रिकदृष्ट्या प्रगत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.’

 

 

 

मार्क्समन डेलीने दिलेला हा सन्मान फ्लीटगार्ड फिल्टर्सने इतक्या वर्षांत मिळवलेल्या विविध पुरस्कारांच्या यादीत दिमाखाने समाविष्ट झाला असून त्यामुळे कंपनीचे आघाडीचे स्थान नव्याने अधोरेखित झाले आहे. कंपनी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आणि वाहन उत्पादन क्षेत्रात गुणवत्तेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी यापुढेही बांधील राहील.s

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments