Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedजय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दगडूशेठ तर्फे १२ हजार वारक-यांची नेत्र व आरोग्य...

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दगडूशेठ तर्फे १२ हजार वारक-यांची नेत्र व आरोग्य तपासणी*  *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विनामूल्य आयोजन*

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे वारक-यांसाठी आयोजित नेत्र व आरोग्य तपासणी शिबीरात १२ हजारहून अधिक वारक-यांची तपासणी करण्यात आली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन ट्रस्ट कार्यरत असून २५ हजार वारक-यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला.

 

शिबीर प्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात वारक-यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर हा एक भाग आहे. या आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, चष्मेवाटप यांसह वारक-यांना प्रवासा दरम्यान येणा-या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. विनामूल्य अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर औषधे देखील देण्यात आली. तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया देखील करुन देण्यात येणार आहे. शिबीरात ६२ डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

 

शिबीरात सत्यसाई सेवा आॅर्गनायझेशन, रेणूका नेत्रालय, रुबी हॉल क्लिनिक, सुर्या सह्याद्री हॉस्पिटल, अलायन्स क्लब आॅफ पुणे, लायन्स क्लब आॅफ कात्रज, जहांगिर हॉस्पिटल, बीव्हीजी लाईफ सायन्स आदी संस्थांनी सहभाग घेतला. यापुढेही ट्रस्टतर्फे विविध मोफत आरोग्य शिबीरे घेण्यात येणार असून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच पुण्यामध्ये पालख्यांचे आगमन होताना मंदिरासमोर पालख्यांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments