Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedभक्ती सर्वश्रेष्ठ असून यात सामर्थ्य समावलेले असते हभप. यशोधन महाराज साखरे महाराज...

भक्ती सर्वश्रेष्ठ असून यात सामर्थ्य समावलेले असते हभप. यशोधन महाराज साखरे महाराज यांचे विचारः पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त लोकशिक्षणपर अभिनव कार्यक्रमाचे समापन

पुणे, १ जुलै ः भक्ती ही सर्वश्रेष्ठ असून यात सामथ्यर्र् समावलेले आहे. भक्ताला ज्ञानाकडून सहज शक्ती मिळते परंतू ज्ञान भक्ती ही आंतरिक असेल तर ती सर्वश्रेष्ठ आनंद देणारी आहेे. याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद याचे देता येईल. असे विचार ह.भ.प. यशोधन महाराज साखरे महाराज यांनी व्यक्त केले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माइर्स एमआईटी, पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीच्या लोकशिक्षणपर अभिनव उपक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, उषा विश्वनाथ कराड, श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. टी.एन.मोरे व ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर उपस्थित होते.

ह.भ.प.साखरे महाराज म्हणाले, आध्यात्मिक मार्गावर चालतांना इच्छा आणि आवड या दोन गोष्टी समजावून घेणे आवश्यक आहे. इच्छा ही निमित्तमात्र असते परंतू आवडीसाठी निमित्त लागते. संतांची आवड ही अनुकरणीय आहे. यात जागाचे कल्याण समावलेले आहे. वारीमुळे संपूर्ण जगाचे कल्याण होते. वारी ही भक्ताचा दृष्टिकोण बदलतो आणि त्याबदलामुळेच जीवनात सुख येते.

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, माऊलीच्या समाधीजवळ भक्ताला सुखाचा अनुभव येतोय. यातून जीवनात प्रसन्नता येते. व्यावहारिक व आध्यात्मिक जगात वावरतांना कर्माला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कर्मानुसार व्यक्तीची बुद्धि बदलत असते त्यामुळे यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. अशावेळेस मन प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व सिद्धीचे एकच कारण राहू शकते ते म्हणजे मला जे मिळेल त्याला सुख असे म्हणेल.

यानंतर लेखक लक्ष्मण घुगे लिखित तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचे दर्शन करणारी सुवर्णपिंपळ ही आध्यात्मिक नाट्यकृती सादर करण्यात आली. किर्तनानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली. हभप शालिकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. हभप महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments