Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedडेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे वारक-यांची मोफत वैद्यकीय तपासणी.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे वारक-यांची मोफत वैद्यकीय तपासणी.

 

 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ब्रिजलाल जिंदाल भौतिकपचार महाविद्यालय व सुभद्रा के. जिंदाल परिचरिका महाविद्यालय यांच्यातर्फे वारक-यांची मोफत वैद्यकीय तपासणी गुप्ते मंगल कार्यालय येथे करण्यात आली. यामध्ये स्नायूंचे विकार, सांधेदुखी, याचबरोबर रक्तदाब व रक्तशर्करा तपासण्यात आली. यावेळी नेत्ररोगतज्ञ व सुभद्रा के. जिंदाल नर्सिंग महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रिती अभ्यंकर यांनी वारक-यांची नेत्रतपासणी केली व चष्मेवाटप केले.

या उपक्रमास ब्रिजलाल जिंदाल फिजिओथेरपीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

आळंदी देवस्थानचे विश्वस्त. डॉ.भावार्थ देखणे यांनी भेट देऊन या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments