पुणे
दिनांक १ जुलै
(क्रीडा प्रतिनिधी)
*मनो-वर्धन* योगसंस्था व *क्रीडाभारती* तर्फे आयोजित केलेल्या
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेतील ३१ ते ५० वर्षे पुरूष व महिला या वयोगटात अनुक्रमे विठ्ठल कडू व दीपा नारकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
ही स्पर्धा प्र.ल.गावडे सभागृह, भावे स्कूल पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पुणे,नाशिक,सातारा,मुंबई इत्यादी ठिकाणच्या शंभरहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. १६ ते ३० वर्षे पुरुष व महिला गटात अनुक्रमे सार्थक हर्षा व सानिका केळकर यांनी प्रथम स्थान घेतले. ५१ ते ६५ वर्षे वयोगटात नागेश धर्माधिकारी यांनी पुरुष गटात प्रथम स्थान मिळविले तर महिला गटात मंगल गवळी विजेत्या ठरल्या. ६६ वर्षावरील गटात धनालाल भोरटक्के व कल्याणी गाडगीळ हे अनुक्रमे पुरुष व महिला गटातील विजेतेपदाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
पद्मश्री पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या हस्ते झाला. यावेळी क्रीडाभारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे, पुणे महानगर अध्यक्ष प्रा.शैलेश आपटे, पुणे महानगर मंत्री विजय राजपूत,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, मनो-वर्धन योगसंस्थेचे संचालक मनोज पटवर्धन, सहसंचालिका माधुरी पटवर्धन, सहसंचालक स्वानंद पटवर्धन,परीक्षक म्हणून सोनाली कानिटकर,चंद्रशेखर कुलकर्णी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे व्यवस्था प्रमुख म्हणून क्रीडा भारतीचे सहमंत्री भाऊराव खुणे यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.
गटवार निकाल -१६ ते ३० वर्षे पुरुष-१. सार्थक हर्षा,२. सायलेन जेठी, ३.ओम कुशवाह. महिला-१.सानिका केळकर,२. श्रद्धा दीक्षित,३. निकिता वाघमारे, उत्तेजनार्थ- अनुश्री जोशी. ३१ ते ५० वर्षे पुरूष-१.विठ्ठल कडू,२.कुल्पोका स्वामी,३. संतोष माळी, ४. चैतन्य कुलकर्णी.महिला-१.दीपा नारकर, २.सायली शिंत्रे,३.सीमा पवार. उत्तेजनार्थ-सुनीता सोनावणे. ५१ ते ६५ वर्षे-पुरूष-१.नागेश धर्माधिकारी,२.जगदीश टेकचंदानी,३.ज्ञानेश्वर पाटील,४.सुहास गोंधळेकर. महिला-१.मंगल गवळी, २.सविता ओतूरकर व संगीता नास्ते, ३.स्वाती किनरे व वसुधा जोशी. ६६ वर्षावरील पुरुष -१. धनालाल भोरटक्के,२.शंकर आव्हाळे, ३.विनायक मुसळे,४. प्रकाश क्षीरसागर. महिला-१.कल्याणी गाडगीळ, उत्तेजनार्थ-नीला पेठे.
अधिक माहितीसाठी
विजय राजपूत
9730010405,
8788469719
पुणे महानगर मंत्री
क्रीडा भारती


