Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedचौथ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स, ओबेरॉय अँड निल...

चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स, ओबेरॉय अँड निल किंग्ज संघांचा दुसरा विजय

पुणे, 2 जुलै 2024- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत ओबेरॉय अँड निल किंग्ज, एएसआर स्ट्रायकर्स या संघांनी विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय नोंदवला

 

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एएसआर स्ट्रायकर्स संघाने मानव ऍव्हेंजर्स संघाचा 280-249 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. बॅडमिंटनमध्ये अश्विन शहा, सनत परमार, उमेद कोठवाला, निरव बाफना, विकास सूद, प्रकाश बूथरा, कपिल बाफना, कुणाल संघवी यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर मानव ऍव्हेंजर्स संघाने एएसआर स्ट्रायकर्स संघाचा 74-56 असा तर, स्क्वॅशमध्ये मानव ऍव्हेंजर्स संघाने एएसआर स्ट्रायकर्सचा 61-45 असा पराभव करून आघाडी वाढवली. टेबल टेनिसमध्ये विग्नेश संघवी, सचिन राठी, कपिल पंजाबी, योगेश अंकलेसारिया, तानिया अंकलेसारिया, रौनक शहा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्स संघाने मानव ऍव्हेंजर्सचा 69-57 असा तर, टेनिसमध्ये रौनक मनुजा, सचिन राठी, किरण सोनावणे, दिपेश संचेती, रौनक शहा, कपिल पंजाबी यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्स संघाने मानव ऍव्हेंजर्सचा 63-34 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. पिकल बॉलमध्ये एएसआर स्ट्रायकर्स संघाने मानव ऍव्हेंजर्सचा 47-23 असा पराभव करून विजय मिळवला.

 

दुसऱ्या सामन्यात कॉन्व्हेकस शार्क्स संघाने हिलयॉस ईगल्स संघाचा 250-228 असा पराभव करून पहिला विजय नोंदवला. बॅडमिंटनमध्ये पंकज शहा, कृष्णा बोरा, सतीश मुंदडा, समीर सलियन, अवराज छाब्रा, अमित दरेकर, आरव खिलनानी, कृष्णा घुवालेवाला यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉन्व्हेकस शार्क्स संघाने हिलयॉस ईगल्सचा 74-30 असा पराभव केला. तर, स्क्वॅशमध्ये कॉन्व्हेकस शार्क्स संघाला हिलयॉस ईगल्स संघाने 25-63 असे पराभूत केले. टेबल टेनिसमध्ये राशिद खोर्शेदी, रिया देशपांडे, चेतन घुवालेवाला, देव घुवालेवाला, पंकज शहा, शिशिर गुप्ता, कृष्णा घुवालेवाला, कृष्णा बोरा यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर कॉन्व्हेकस शार्क्स संघाने हिलयॉस ईगल्सचा 74-27 असा पराभव करून भक्कम अशी विजयी आघाडी घेतली. टेनिसमध्ये हिलयॉस ईगल्स संघाने कॉन्व्हेकस शार्क्सचा 61-46 असा तर, पिकल बॉलमध्ये कॉन्व्हेकस शार्क्सला हिलयॉस ईगल्सने 31-47 असे पराभूत केले.

 

अन्य लढतीत ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने एचके पावरहाऊस संघाचा 261-249 असा पराभव केला. बॅडमिंटन प्रकारात केदार नाडगोंडे, योहान खिंवसरा, प्रीती सप्रे, आनंद शहा, अर्जुन मोटाडू, कुमार पोरवाल, ब्रिन्दा थॉमस, विनय राठी यांच्या विजयी खेळीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने एचके पावरहाऊसचा 69-59 असा तर, स्क्वॅशमध्ये क्रिश डिमला याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने एचके पावरहाऊसचा 48-37 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये रियान मुजगुले, विनय राठी, केदार नाडगोंडे, बी.एस.राजपुरोहित यांच्या कामगिरीच्या जोरावर किंग्ज संघाने एचके पावरहाऊसचा 68-62 असा पराभव केला. टेनिसमध्ये ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाला एचके पावरहाऊस संघाने 42-49 असे , तर पिकल बॉलमध्ये किंग्जला एचके पावरहाऊसने 34-42 असे पराभूत केले.

 

 

निकाल: साखळी फेरी:

एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. मानव ऍव्हेंजर्स 280-249

बॅडमिंटन: एएसआर स्ट्रायकर्स पराभुत वि. मानव ऍव्हेंजर्स 56-74;

स्क्वॅश: एएसआर स्ट्रायकर्स पराभुत वि. मानव ऍव्हेंजर्स 45-61;

टेबल टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. मानव ऍव्हेंजर्स 69-57;

टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. मानव ऍव्हेंजर्स 63-34;

पिकल बॉल: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. मानव ऍव्हेंजर्स 47-23;

 

कॉन्व्हेकस शार्क्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 250-228;

बॅडमिंटन: कॉन्व्हेकस शार्क्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 74-30;

स्क्वॅश: कॉन्व्हेकस शार्क्स पराभूत वि.हिलयॉस ईगल्स 25-63;

टेबल टेनिस: कॉन्व्हेकस शार्क्स वि.वि.हिलयॉस ईगल्स 74-27;

टेनिस: कॉन्व्हेकस शार्क्स पराभुत वि.हिलयॉस ईगल्स 46-61;

पिकल बॉल: कॉन्व्हेकस शार्क्स पराभुत वि.हिलयॉस ईगल्स 31-47;

 

ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एचके पावरहाऊस 261-249

बॅडमिंटन: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एचके पावरहाऊस 69-59;

स्क्वॅश: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एचके पावरहाऊस 48-37;

टेबल टेनिस:ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एचके पावरहाऊस 68-62;

टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभुत वि.एचके पावरहाऊस 42-49;

पिकल बॉल: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभुत

वि.एचके पावरहाऊस 34-42.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments