Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले लयबद्ध योगासन

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले लयबद्ध योगासन

 

 

पुणे, ८ जुलैः महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतिने नुकताच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या १४ योगपट्टूंनी संगीताच्या तालावर लयबद्ध पद्धतीने योगासनांचे सर्वोत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. ४ मिनिटांमध्ये या विद्यार्थ्यांनी लयबद्ध योगासन प्रकार सादर केले.

एसपी कॉलेज रमाबाई हॉल येथे ऑलिम्पिक दिनासाठी ऐशानी बाहेती, दिशिता मकाती, अन्विता जोशी, अस्मी जोशी, जिझा मलावे, अनिशा काबरा, निधीश तारळकर, शिवांगी जी, माहिकी पटवर्धन, अदविका जाधव, तनिष्का अमेसुर, शर्वणी जाधव, अवनी पाटील, इनेश परिहार यांनी वेगवेगळी योगासने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्य अजितदादा पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, राजीव गांधी खेल पुरस्कार प्राप्त धनराज पिल्ले, महासचि नामदेव शिरगावकर आणि उपाध्यक्ष प्रदीप गंधे उपस्थित होते.

योगासनांचे प्रात्यक्षिक पाहून क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ऑलिम्पिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष संजय मालपाणी आणि मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी प्रोत्साहन दिले. तसेच स्कूलचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments