Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedशैक्षणिक प्रकल्पांमुळे भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ - हेमंडोयल डिल्लम मॉरिशसच्या शिष्टमंडळाची पिंपरी...

शैक्षणिक प्रकल्पांमुळे भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ – हेमंडोयल डिल्लम मॉरिशसच्या शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड विद्यापीठास भेट

पिंपरी, पुणे (दि. ०८ जुलै २०२४) – शैक्षणिक अभ्यासक्रमांचे संयुक्त प्रकल्प, संशोधन सहयोग, विद्यार्थी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, फॅकल्टी एक्सचेंज आणि संयुक्त पदवी कार्यक्रमाव्दारे भारत आणि मॉरिशस यांचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मॉरिशसचे उच्चायुक्त हेमंडोयल डिल्लम यांनी व्यक्त केला.

मॉरिशसचे उच्चायुक्त हेमंडोयल डिल्लम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठास (पीसीयू)‌ भेट दिली. जीटीटीसी इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव गुप्ता, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, मार्केटिंग प्रमुख जमीर मुल्ला आदी उपस्थित होते. हेमंडोयल डिल्लम यांनी पीसीयुची शैक्षणिक वाटचाल, उत्कृष्टतेबद्दल कौतुक केले. जागतिक व्यापार बाजार, भारतीय शिक्षण आणि सहकार्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवरही चर्चा केली.

डॉ. गौरव गुप्ता म्हणाले, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) ३३ वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. पीसीयुने आधुनिक तंत्रज्ञान आणि काळाची गरज ओळखून विद्यार्थी केंद्रीत अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत, असे सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) १९९० मध्ये स्थापन झाल्यापासून उत्कृष्ट शैक्षणिक वाटचाल करीत आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू), पीसीईटीच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यातील गरज ओळखून नवीन पर्याय, संशोधनाला प्रोत्साहन देऊन उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम केले जाते. वेगाने वाढत असलेल्या पुणे महानगरातील साते, वडगाव मावळ येथील दहा एकरांच्या विस्तीर्ण परिसरात, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठात आठ वेगवेगळ्या विभागांतर्गत बी.ए., बीबीए, बीसीए, बी. टेक, बी. डेस, बी. एस्सी, बी. फार्म, एलएलबी, एमबीए, एम. टेक, एम. एस ते पी. एच. डी. पर्यंत विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत असे डॉ गिरीश देसाई यांनी सांगितले.

मॉरिशस-पीसीयू शैक्षणिक अभ्यासक्रम देवाणघेवाण तसेच प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या परस्परांच्या सहभागातून शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असे डॉ. मणीमाला पुरी म्हणाल्या.

पीसीयुने सुरू केलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती डॉ. सुदीप थेपडे यांनी दिली.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.

स्वागत डॉ. गिरीश देसाई, सूत्रसंचालन प्रा. रूचू कुथियाला यांनी केले. कार्यक्रमास विविध विद्या शाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.


——-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments