Pune: पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह इंटीरिअर्स, सीटिंग व स्पेशलिटी वेईकल्स कंपनीने आपत्कातीन वैद्यकीय परिवहनामधील नवीन आविष्कार एडी-जेन अॅम्ब्युलन्स लाँच केली आहे. सेमी-प्रीमियम व्हेरिएण्ट एडी-जेन अॅम्ब्युलन्स अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाइन एलीमेंट्सच्या माध्यमातून भारतभरातील रूग्णवाहिकांच्या विद्यमान ताफ्याचे मानक उंचावण्यावर लक्ष केंद्रित करते. हे व्हेरिएण्ट सर्व वेईकल प्लॅटफॉर्म्सवर निर्माण व रूपांतरित करता येऊ शकते.
”एडी-जेन अॅम्ब्युलन्ससह आमचा देशभरात उच्च दर्जाच्या व उपलब्ध होण्याजोग्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे,” असे पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. अरिहंत मेहता म्हणाले. ”आम्हाला माहित आहे की, अपघातानंतर किंवा वैद्यकीय आपत्तीमध्ये सुरूवातीच्या १० ते २० मिनिटांमध्ये साह्य जीवन व मृत्यूमध्ये बदल घडवून आणू शकते. ही रूग्णवाहिका प्रतिसाद वेळ सानुकूल करण्यासाठी आणि रूग्ण निष्पत्ती सुधारण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.”
रूग्णवाहिका इकोसिस्टम सुधारण्यामध्ये आर्थिक अडचणींचा देखील मोठा अडथळा येतो. फंडिंगमधील कमतरतेमुळे रूग्णवाहिका ताफा अपग्रेड करणे, प्रगत वैद्यकीय उपकरण खरेदी करणे आणि सेवा वितरण व प्रतिसाद वेळ वाढवू शकणाऱ्या तंत्रज्ञान नाविन्यतांची अंमलबजावणी करणे याप्रती लागणाऱ्या पैशांचा तुटवडा जाणवू शकतो.
”याच कारणामुळे आम्ही एडी-जेन अॅम्ब्युलन्स सादर केली आहे. ही रूग्णवाहिका किफायतशीर व उच्च दर्जाच्या वैद्यकीय परिवहन सोल्यूशन्ससंदर्भात गरजेची पूर्तता करते आणि हे सोल्यूशन्स भारतभरातील सरकार, खाजगी आरोग्यसेवा प्रदाते एनजीओ, हेल्थकेअर सेंटर्स, निवासी सोसायटीज आणि व्यावसायिक कार्यस्थळांसाठी प्रखर मानकांची पूर्तता करतात,” असे श्री. अरिहंत मेहता म्हणाले.
डिझाइन आणि कार्यक्षमता
अन्न व किराणा माल डिलिव्हरी अशा इतर क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती झाली असताना देखील वैद्यकीय आपत्ती परिवहन सेवा अनेकदा कमी पडणाऱ्या देशामध्ये या सेमी-प्रीमियम अॅम्ब्युलन्सच्या सादरीकरणामधून प्रबळ आरोग्यसेवा पायाभूत सुविधेसाठी महत्त्वपूर्ण गरज दिसून येते. आपत्ती स्थितीत, अपघातामुळे झालेल्या दुखापतींनंतर किंवा गंभीर संकटानंतर महत्त्वपूर्ण ‘गोल्डन अवर’दरम्यान उत्तमरित्या सुसज्ज रूग्णवाहिका मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम घडवून आणू शकते, शक्यतो जीवन वाचवू शकते.
एडी-जेन अॅम्ब्युलन्सच्या अद्वितीय डिझाइन घटकांबाबत मत व्यक्त करत पिनॅकल इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्री. सचिन देशमुख म्हणाले, ”एडी-जेन अॅम्ब्युलन्सचे सर्वोत्तम वैशिष्ट्य
म्हणजे इम्पॅक्ट रेसिस्टण्स, थर्मल इन्सुलेशन आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑटोमोटिव्ह एबीएस अॅक्रिलोनिट्राइल बुटाडाइन स्टिरिन)चा वापर करत अपग्रेड करण्यात आलेले परिपूर्ण इंटीरिअर. यामधील सिंगल-पीस साइड पॅनेल्स कंपन व आवाज कमी करतात, तसेच सहजपणे साफसफाई व निर्जंतुकीकरणाची खात्री देतात. मटेरिअलचे केमिकल रेसिस्टण्स विविध स्थितींमध्ये टिकाऊपणाची खात्री देते.”
पारंपारिक मजबूतीकरणासह उच्च ताकदीचे अॅल्युमिनिअम रेल्स बसवण्यात आले आहेत, जे वाहनाच्या रचनेबाबत तडजोड न करता उपकरण बसवण्यामध्ये साह्य करतात. हे रेल्स १०जी भार सामावून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थिरता वाढते आणि कंपन-संबंधित जोखीम कमी होतात. युरोपियन प्रमाणित सीट्स त्यांच्या फोल्डेबल डिझाइनसह आरामदायी व सानुकूल स्पेस देतात, ज्याला पूरक असे इंटीरिअर लेआऊट आहे, जे आपत्कालीन कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. भारतातील समकालीन रूग्णवाहिकांच्या तुलनेत ही वेईकल युरोपियन मानकांचे पालन करते. या रूग्णवाहिकेमध्ये रूग्ण, डॉक्टर आणि परिचारिका किंवा रूग्णाचा नातेवाईक सामावू शकतात, तसेच सुधारित स्वच्छतेसाठी कर्टन्स व वॉशबेसिन्स आहेत.
प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्ये
तसेच, बहुतांश रूग्णवाहिकांमध्ये रूग्णांना हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना पुरेशी वैद्यकीय उपकरण व तंत्रज्ञान सपोर्टचा अभाव असतो. या सुविधा हार्ट अॅटॅक्स, स्ट्रोक्स किंवा गंभीर अपघात अशा स्थितींमध्ये विशेषत: महत्त्वाच्या आहेत, जेथे त्वरित वैद्यकीय हस्तक्षेपांमुळे स्थिती गंभीर होण्याला प्रतिबंध होऊ शकतो आणि निष्पत्तींमध्ये सुधारणा होऊ शकते. ”या समस्येचे निराकरण करण्यासाठी एडी-जेन अॅम्ब्युलन्समध्ये प्रगत लाइफ सपोर्ट सिस्टम्ससह डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, इलेक्ट्रिक संक्शन पंप आणि इन्फ्यूजन पंप आहे, जे सुरक्षित असण्यासोबत सहजपणे उपलब्ध होतात. ज्यामुळे गंभीर स्थितींदरम्यान उत्तम वैद्यकीय सुविधेची खात्री मिळते,” असे श्री. देशमुख म्हणाले.
एडी-जेनमधील ऑक्सिजन कॅबिनेटमध्ये अचूक देखरेख व प्रोग्रामेबल अलार्म्ससाठी डिजिटल ऑक्सिजन सिस्टम आहे. समर्पित ड्रग कॅबिनेट औषधांची उपलब्धता व सुरक्षितता वाढवते, ज्यामुळे आपत्ती काळात विलंब व त्रुटी कमी होतात. रूग्णवाहिकेच्या आतील भागामध्ये समायोजित करता येणारी लायटिंग सानुकूल व्हिजिबिलिटी देते, जे रात्रीच्या वेळी ऑपरेशन्ससाठी महत्त्वाचे आहे. एडी-जेनमधील इंटीग्रेटेड इलेक्ट्रॉनिक सिस्टम्समध्ये कंट्रोल स्क्रिन, मोबाइल डेटा टर्मिनल (एमडीटी) आणि महत्त्वपूर्ण चिन्हांच्या सुलभ उपलब्धतेसाठी डिजिटल ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टम (ओडीएस) कंट्रोल पॅनेल, कम्युनिकेशन्स सिस्टम्स व नेव्हिगेशन टूल्स आहेत, ज्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित होत नाही. हे मॉनिटर्स पॅरामेडिक्स व ईएमटीकरिता रिअल-टाइम डेटा देतात, ज्यामुळे ते रूग्णाच्या स्थितीची तपासणी करण्यास आणि गरज असल्यास त्वरित हस्तक्षेप करण्यास सक्षम होतात.
एडी-जेनच्या आयटी पायाभूत सुविधेमध्ये प्रबळ टॅब्लेटसह इलेक्ट्रॉनिक पेशंट केअर रिपोर्टिंग (ईपीसीआर)साठी ईएमएसओ अॅप, जीपीएस, लाइव्ह ट्रॅफिक अपडेट्स आणि अटेण्डन्स मॅनेजमेंट आहे. अतिरिक्त आयटी वैशिष्ट्ये आहेत, ४जी-आधारित जीपीएस, आरएफआयडी, व्हीटीएमएस आणि सर्वसमावेशक कार्यरत कार्यक्षमतेसाठी एनएफसी टॅग्स.
तसेच, रूग्णवाहिका सेवा आणि आरोग्यसेवा सुविधा यांच्यामधील प्रभावी समन्वय रूग्णांच्या विनासायास हस्तांतरणाची खात्री देते, ज्यामुळे घटनेपासून हॉस्पिटलमध्ये विशेष उपचार मिळण्यापर्यंत उत्तम केअर घेतली जाते. ही सेवा कम्युनिकेशन सिस्टम्स व प्रोटोकॉल्सच्या माध्यमातून दिली जाते, जे माहिती शेअर करण्यासोबत वैद्यकीय निर्णय घेण्यामध्ये मदत करतात. एडी-जेन अॅम्ब्युलन्सची त्वरित प्रतिसाद देण्याची, महत्त्वपूर्ण वैद्यकीय हस्तक्षेप देण्याची आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये हस्तांतरण करण्याची क्षमता आपत्कालीन स्थितीमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते, शक्यतो जीवन वाचू शकते आणि व्यक्ती व समुदायांवर वैद्यकीय आपत्तींच्या परिणामांचे निराकरण करू शकते.
नाविन्यता, दर्जा व विश्वसनीयतेवर लक्ष केंद्रित करत पिनॅकल इंडस्ट्रीज सातत्यपूर्ण तंत्रज्ञान प्रगती आणि आरोग्यसेवा प्रदाता व सरकारी कंपन्यांसोबत सहयोगांच्या माध्यमातून आरोग्यसेवा पायाभूत सुविधा प्रगत करण्याप्रती कटिबद्ध आहे.


