Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हॉट्सॲपकडून वापरकर्त्‍यांना सुरक्षित ठेवण्‍यासाठी ग्रुप मेसेजिंगमध्‍ये कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड लाँच

व्हॉट्सॲपकडून वापरकर्त्‍यांना सुरक्षित ठेवण्‍यासाठी ग्रुप मेसेजिंगमध्‍ये कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड लाँच

राष्‍ट्रीय, जुलै 10, २०२४: व्हॉट्सॲप नवीन वैशिष्‍ट्य आणत आहे, जे वापरकर्त्‍यांना ग्रुप मेसेजिंगमध्‍ये सुरक्षित राहण्‍यास मदत करेल.

 

तुम्‍हाला अनोळखी व्‍यक्‍तीने एखाद्या ग्रुपमध्‍ये जोडले तर कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड त्‍या ग्रुपबाबत अधिक माहिती देईल. यामध्‍ये तुम्‍हाला ग्रुपमध्‍ये कोणी जोडले, ग्रुप कधी तयार करण्‍यात आला आणि कोणी तयार केला याबाबत माहिती मिळेल. त्‍यानंतर तुम्‍ही ग्रुपमध्‍ये राहायचे की ग्रुपमधून बाहेर पडायचे हे ठरवू शकता, तसेच व्हॉट्सॲपवर सुरक्षित राहण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या काही सेफ्टी टूल्‍सचे पुनरावलोकन करू शकता.

 

तुम्‍ही एखाद्या व्‍यक्‍तीला किंवा व्‍यक्‍तींच्‍या समूहाला नुकतेच भेटले असाल आणि त्‍यांचे फोन क्रमांक कॉन्‍टॅक्‍ट्समध्‍ये सेव्‍ह केले नसल्‍यास हे वैशिष्‍ट्य विशेषत: उपयुक्‍त ठरेल. तसेच हे वैशिष्‍ट्य तुम्‍हाला ग्रुप माहित आहे की नाही किंवा तुम्‍हाला ग्रुपमध्‍ये राहायचे आहे की नाही याबाबत पुष्‍टी देण्‍यास मदत करू शकते.

 

हे अपडेट व्हॉट्सॲप वापरकर्त्‍यांना सायलेंसिंग अननोन कॉलर्स, चॅट लॉक,इन ऍप प्रायव्हसी चेक अप आणि कंट्रोलिंग हू कॅन ऍड यु टू ग्रुप्स यांसारख्‍या वैशिष्‍ट्यांसह अधिक सुरक्षितता देते. हे अपडेट १:१ मेसेजिंगमधील सध्‍याच्‍या अनुभवाप्रमाणे आहे, जेथे तुम्‍हाला अनोळखी व्‍यक्‍तीकडून मेसेज असल्‍यास अधिक संदर्भ दिला जातो

 

या वैशिष्‍ट्याची वापरकर्त्‍यांसाठी सुरूवात झाली आहे आणि आगामी आठवड्यांमध्‍ये सर्व वापरकर्त्‍यांसाठी हे उपलब्‍ध असे

ल;

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments