• वार्षिक जागतिक अहवालात, कंपनीच्या कॉर्पोरेट मूल्य वाढवणाऱ्या उपक्रमांची सर्वसमावेशक माहिती देण्यात आली आहे. भागधारकांसोबतच्या संवादाच्या माध्यमातून परस्पर सलोखा बळकट होतो.
• शाश्वत मूल्य निर्मिती आणि टिकाऊ समाजाच्या परीपूर्ततेला पाठींबा देण्यासाठी कंपनीची वचनबद्धता या अहवालातून अधोरेखित करण्यात आली आहे.
• या अहवालात, नव्या मध्यम मुदत व्यासाय योजना (2024-26) रूपरेषेचा समावेश आहे. यात कंपनीचे आर्थिक धोरण आणि शाश्वत उदिष्टे तसेच इतरही अनेक बाबींचा समावेश आहे.
टोकियो (10जुलै, 2024) — Bridgestone 3.0 Journey 2024 Integrated Report*1 हा आपला अगदी नवा एकात्मिक अहवाल (इंटीग्रेटेड रिपोर्ट) जारी करत असल्याचे ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनने आज जाहीर केले. त्यांनी हा अहवाल त्यांच्या कॉर्पोरेट संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या अहवालात मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी ब्रिजस्टोनचा दृष्टीकोन आणि उपक्रमांबाबतचे सर्वसमावेशक आकलन करण्यात आले आहे. यातून भागधारकांसोबत संवादाच्या माध्यमातून परस्पर समन्वय जास्त घनिष्ट होतील.
मध्यम मुदत व्यवसाय योजना (2024-2026) (24 एमबीपी) च्या अनुषंगाने, द ब्रिजस्टोन 3.0 जर्नी 2024, एकात्मिक अहवालात ब्रिजस्टोनचे मूल्य अधोरेखित करण्यात आले आहे. शाश्वत मूल्य निर्मितीसाठी पाया रचण्याच्या अंमलबजावणी योजनांची रूपरेषा त्यात देण्यात आली आहे. ही योजना 2030 Long Term Strategic Aspiration*2 (2030 दीर्घ मुदत धोरणात्मक महत्त्वाकांक्षा) या आधाराने तयार करण्यात आली आहे. त्यांच्या कॉर्पोरेट बदलाचा हा दिशादर्शक आहे. एक स्पष्ट धोरणात्मक दृष्टीकोन आणि त्या दिशेने प्रगती दाखवून मूल्य सह-निर्मितीसाठीच्या पुढाकारची भूमिका हा एकात्मिक अहवाल पर पाडत आहे.
“24 एमबीपी रूपरेषेवर आधारित एक शाश्वत उपाययोजना कंपनी म्हणून आमच्यात बदल होत असताना, आमच्या 2024 एकात्मिक अहवालात आम्ही आमच्या भागधारकांसोबत आमचे विचार आणि उपक्रमांची प्रगती सामायिक करत आहोत. आमच्या बदलाचा आराखडा स्पष्टपणे तुमच्या समोर सदर करत असताना, टिकाऊ समाजाच्या परीपूर्ततेसाठी तुमची आमच्या प्रवासात सहभागी व्हाल, अशी आमची आशा आहे. “पॅशन फॉर एक्सलन्स” अर्थात गुणवत्तेसाठीच्या तळमळीचा अथक पाठपुरावा करून आणि 24 एमबीपी अंतर्गत अंमलबजावणी आणि परिणाम दाखवून देण्यावर लक्ष केंद्रित करून ब्रिजस्टोन शाश्वत मूल्य निर्मितीसाठी पाय रचण्याच्या आव्हानाला सामोरी जात राहणार आहे.“
ब्रिजस्टोन 3.0 जर्नी 2024, एकात्मिक अहवालात नमूद करण्यात आलेले विषय, मुख्य मुद्दे आणि कामकाजाच्या प्रगतीचा आढावा पुढे देण्यात आला आहे.
मध्यम मुदत व्यवसाय योजना (2024-26): 24 एमबीपी
मध्य मुदत व्यवसाय योजना (2021-2023) च्या गोषवाऱ्यामध्ये आणि 24 एमबीपीच्या रुपरेषेमध्ये प्रगती आणि 2030 दीर्घ मुदत धोरणात्मक महत्त्वाकांक्षेच्या अनुषंगाने मूल्य निर्मिती करणारे सातत्यपूर्ण उपक्रम दर्शवण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसाय परिस्थितीमधील बदल, जागतिक व्यवस्थापन धोक्यांमधील कंपनीचा प्रतिसाद, जागतिक व्यवस्थापन निर्देशक आणि नवीन तसेच परिणामकारकता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या वास्तविक ‘ग्लोकल’ (जागतिक-स्थानिक) व्यवस्थापन रचनेचा समावेश आहे.
24, एमबीपी व्यवसायाला आकार देणारी परिस्थिती: मूल्य निर्मितीवर अधिक भर
24 एमबीपीमध्ये, व्यवसायाला आकार देण्याच्या परिस्थितीनुसार मूल्य निर्मितीवर जास्त भर देण्यात आला आहे. यामध्ये चार परिस्थितींचा समावेश आहे: चांगली व्यवसाय गुणवत्ता निर्मिती, चांगले टायर निर्मिती, चांगला व्यवसाय निर्मिती आणि भविष्यासाठी चांगला पाया रचून नवीन व्यवसाय निर्मिती.
चांगला व्यवसाय गुणवत्ता निर्मिती: 24 एमबीपीच्या पहिल्या वर्षातील हा सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा आहे. आपली अद्वितीय डेमिंग योजना ठोसपणे मांडून आणि त्यात पुन्हा सुधारणा करून जागतिक पातळीवर व्यवस्थापन, कामकाज आणि व्यवसाय गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी ब्रिजस्टोन प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. यातून कंपनीचा ‘गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे’ हा डीएनए आणि ‘उत्कृष्ट गुणवत्तेच्या माध्यमातून समाजसेवा’ हे उद्दिष्ट दिसून येते. क्षमता सर्जनशीलता सुधारणे, ब्रिजस्टोनचे डिजिटल परिवर्तन (डीएक्स), ब्रिजस्टोनच्या इनोव्हेशन पार्कचा उपयोग करून सह-निर्मिती प्रयत्न आणि बौद्धिक संपत्ती धोरण यासारख्या त्यांच्या मूल्य निर्मितीच्या अद्ययावत पायाचाही या अहवालात समावेश आहे.
चांगल्या टायरची निर्मिती: उत्पादन रचनेसाठी मूलभूत तंत्रज्ञान एललायटेन (ईएनएलआयटीईएन) आणि ब्रिजस्टोनच्या मुख्य टायर व्यवसायासाठीचे अद्वितीय ‘नवीन प्रीमिअम’, आणि संशोधन व विकास आणि व्यवसाय खर्च कमी करणारे उत्पादन मूलभूत तंत्रज्ञान बीसीएमए हे एकत्रित करून मूल्य निर्मितीला गती देणाऱ्या कंपनीच्या उपक्रमांची अद्ययावत माहिती अहवालात देण्यात आली आहे.
चांगला व्यवसाय निर्मिती: सामाजिक मूल्य आणि ग्राहक मूल्य निर्मितीला गती देण्यासाठी ब्रिजस्टोन राबवत असलेल्या उपक्रमांची अद्ययावत माहिती या अहवालात देण्यात आली आहे. या प्रयत्नांमुळे कंपनीला स्पर्धात्मक लाभ आणि कॉर्पोरेट मूल्य निर्माण करण्यासाठी मदत मिळेल. संपूर्ण मूल्य शृंखलेतील व्यवसाय खर्च कमी करणे, चॅनल पॉवर बळकटीसह नवीन प्रीमिअम टायर व्यवसाय मॉडेल स्थापन करणे आणि शाश्वत प्रीमिअम ब्रँड प्रस्थापित करण्यासाठीचे हे उपक्रम आहेत.
भविष्यासाठी चांगला पाया रचून नवीन व्यवसाय निर्मिती: या अहवालामध्ये, ब्रिजस्टोनच्या उपाययोजना व्यवसायाबाबत अद्ययावत माहिती देण्यात आली आहे. हे दान-तोत्सू (Dan-Totsu) उत्पादनांचे मूल्य वाढवते. यात गतिशीलता तंत्रज्ञान व्यवसाय निर्मिती करणाऱ्या त्यांच्या ट्रक आणि बस उपाययोजना, खाण उपाययोजना आणि उड्डयन उपाययोजनांचा समावेश आहे. “सोईंग न्यु सीड्स” (नवीन पाया रचणे): पुनर्वापर व्यवसाय, हवा भरण्याची गरज नसणारे पुढच्या पिढीचे एअरफ्री टायर, चंद्राच्या रोव्हरचे टायर आणि सॉफ्ट रोबोटिक्स यासारख्या ब्रिजस्टोनच्या संशोधनात्मक व्यवसाय उपक्रमांच्या स्वरूपात मूल्य निर्मितीची अद्ययावत माहितीचाही समावेश या अहवालात करण्यात आला आहे.
शाश्वत मूल्य निर्मितीसाठी पाया रचणे
ब्रिजस्टोनचा अद्वितीय शाश्वत व्यवसाय मॉडेलच्या प्रगतीची अद्ययावत माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. कार्बन उदासीनता आणि संपूर्ण मूल्य शृंखलेतील चक्रीय अर्थव्यवस्थेच्या परिपूर्तीसोबत हे मॉडेल कंपनीच्या व्यवसायाला जोडण्याचे काम करते. निसर्गाच्या सकारत्मकतेसाठी उपक्रमांच्या माध्यमातून ‘उत्पादन आणि विक्री’ टप्प्यापासून आणि ‘वापर ते टायरचे ‘नूतनीकरण’ ते कच्चा मालापर्यंत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत मूल्य निर्मितीसाठी ब्रिजस्टोनच्या उपक्रमांची रूपरेषा या अहवालात देण्यात आली असून व्यवसायाला आकार देण्याची परिस्थिती त्यात एकत्रित करण्यात आली आहे.
आर्थिक धोरण
ब्रिजस्टोनच्या आर्थिक धोरणांच्या उद्दिष्टांची रूपरेषा: त्यांचे व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचे केपीआय व्यवस्थापन म्हणून आरओआयसीवर लक्ष केंद्रित करत आहेत. आरओई हे त्यांचे जागतिक व्यवस्थापन निर्देशक आहे, प्रत्येक क्षेत्र आणि व्यवसाय आर्थिक पोर्टफोलिओ आणि भांडवली खर्च आणि प्रत्येक व्यवसाय पोर्टफोलिओवर धोरणात्मक संसाधनांचे वाटप.
विश्वासार्हता वाढवणे
या एकात्मिक अहवालात कंपनीने त्यांच्या भागधारक सहभागाचे उपक्रम समाविष्ट केले आहेत. हे उपक्रम शाश्वत मूल्य निर्मितीसाठीचा पाया म्हणून काम करतात. या खेरीज, स्थानिक समुदायासोबत सलोखा प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या माध्यमातून समाजामध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी जे उपक्रम तयार करण्यात आले आहेत, त्याचीही अद्ययावत माहिती या अहवालात देण्यात आली आहे. मानवी हक्कांचा आदर आणि नैसर्गिक रबरसाठी मूल्य शृंखला अशा शाश्वत प्राधान्य उपक्रमांचा यात समावेश आहे.


