सध्या देशभरात समाजामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरातील गावागावातून निमंत्रण अक्षता व मंगल कलशाच्या यात्रा निघाल्यात आहेत. रामसेवक घरोघरी निमंत्रण अक्षता पोहचवत आहेत.
त्यातच पुण्यातील निवृत्त सैन्य अधिकारी कर्नल एस वि प्रसाद , गिरीश परदेशी यांच्या नेतृत्वात निवृत्त सैन्य अधिकारी,पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील रामभक्त मर्यादापुरी अयोध्येला जाण्यासाठी थेट सायकलवर पुण्यनगरीतून निघाले आहेत.
पुणे ते अयोध्या असे एकंदरीत १९०० किमी प्रवास सायकलने करणार असून महाराष्ट्र ,मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या तीन राज्यातून प्रवास होणार आहे.तसेच उज्जैन ओंकारेश्वर, चित्रकूट , प्रयागराज आणि वाराणसी या पवित्र तीर्थक्षेत्राचे व देवदर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण साहसी प्रवास ते एकूण १९ दिवसात पूर्ण करणार आहेत.विश्व हिंदू परिषद तर्फे सर्व रामभक्त सायकल स्वारांचा सन्मान व निरोप देण्यासाठी वीर महाराणा उद्यान जवळ एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा पोलीस
उपायुक्त श्री संदीपसिंह गिल्ल ,परिषदेचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख श्री किशोर चव्हाण , महानगर अभियान प्रमुख श्री प्रसाद लवळेकर, पूर्व पुणे विभाग मंत्री श्री धनंजय गायकवाड,जिल्हा मंत्री श्री विजय कांबळे उपस्थित होते.
प्रथम जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. परिषदेच्या मातृ शक्तीने शूर राम भक्तांचे औक्षण केले व श्री गिल्ल यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. श्री चव्हाण यांनी उपक्रमाची माहिती दिली.तर श्री गिल्ल यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.त्यांनतर भगवा ध्वज दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शक म्हणून विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतलेला आहे .तसेच या कार्यक्रमाचा श्रीगणेशा विश्व हिंदू परिषद , पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या सौजन्याने पार पडला.
कार्यक्रमास कसबा जिल्हा मातृशक्ती संयोजिका सरिता ताई अंबिके , जिल्हा दुर्गा वाहिनी संयोजिका प्रियंका ताई इंदुलकर , प्रखंड संयोजक बजरंग दल रोहन खिलारे व अन्य निवासी कार्यकर्ते तसेच समाजातील मातृशक्ती आणि सज्जनशक्ती यांनी प्रामुख्याने आपली उपस्थिती दर्शवली.
निवृत्त सैन्य अधिकारी रामभक्तांची सायकलने अयोध्या वारी
RELATED ARTICLES


