Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)* *बुधवार, दि.१० जानेवारी २०२४*

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)* *बुधवार, दि.१० जानेवारी २०२४*

 

 

*मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)*

*बुधवार, दि.१० जानेवारी २०२४

 

● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.

(महिला व बालविकास)

 

● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी

(ग्राम विकास विभाग)

 

● शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.

(वित्त विभाग)

 

● ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी

(वित्त विभाग )

 

● जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी

(दिव्यांग कल्याण विभाग)

 

● पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता

(ग्राम विकास विभाग)

 

● महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार

(मदत व पुनर्वसन विभाग )

 

● राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी

(अन्न व नागरी पुरवठा)

 

• राज्यात न्यायिक

अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत व ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याबाबत.

(विधी व न्याय विभाग)

 

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments