प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जोडीला फॉर्च्युन 500 पैकी 31 संस्थांसह विविध प्रकारची ग्राहकश्रेणी असलेली जागतिक डिजिटल आणि तंत्रज्ञान सेवा कंपनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजार नियामक सेबीकडे डीआरएचपी दाखल केला आहे.
प्रवर्तक विक्री समभागधारक सीए मॅग्नम होल्डिंग्ज (कार्लाइल प्रायव्हेट इक्विटीशी संलग्न) यांच्यातर्फे मुंबईत मुख्यालय असलेल्या कंपनीचा 9,950 कोटी रु.चा आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेल आहे.
हेक्सावेअर संपूर्ण अमेरिका, युरोप आणि आशिया-पॅसिफिक (भारत आणि मध्य पूर्व भागासह) येथील ग्राहकांना सेवा देते व 16 कार्यालयांद्वारे समर्थित 38 वितरण केंद्रांचा समावेश करत वितरणात त्यांनी जागतिक स्थान मिळविले आहे. 30 जून 2024 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक श्रीकृष्ण रामकार्तिकेयन यांच्या नेतृत्वाखाली 28 देशांमधील 31,870 कर्मचाऱ्यांची टीम होती.
वित्तीय सेवा, आरोग्यसेवा आणि विमा, उत्पादन आणि ग्राहक, हाय-टेक व व्यावसायिक सेवा, बँकिंग आणि प्रवास, वाहतूक अशा सहा ऑपरेटिंग विभागांद्वारे हेक्सावेअर आपले व्यवसाय व्यवस्थापन करते.
त्यांच्या ऑफरिंगमध्ये डिझाइन आणि बिल्ड, सिक्युअर अँड रन, डेटा व एआय, ऑप्टिमाइझ आणि क्लाउड सेवा अशा पाच व्यापक सेवांचा समावेश असून, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी RapidX™, Al-powered ऑटोमेशनसाठी Tensai® आणि क्लाउड ॲडॉप्शनसाठी Amaze® यासारख्या एआय सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे त्याच्या सेवा वितरित करते.
हेक्सावेअर जागतिक मालमत्ता व्यवस्थापन संस्था, जागतिक जीवन विज्ञान कंपन्या, जागतिक विमा कंपन्या, जागतिक उत्पादन संस्था, जागतिक किरकोळ आणि CPG संस्था, जागतिक हायटेक कंपन्या, जागतिक लेखापरीक्षण आणि सल्लागार संस्था, जागतिक कायदेशीर संस्था; युनायटेड स्टेट्समधील काही अग्रणी बँका आणि उत्तर अमेरिकेतील विमान कंपन्या यांना सेवा देते.
CY2023 पर्यंत 31 डिसेंबर, 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षानुसार, कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल 997 कोटी रु.च्या PAT सह 10,380 कोटी रु. होता आणि 30 जून 2024 रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी कामकाजातून मिळणारा महसूल 553 कोटी रु. च्या PAT सह 5,684 कोटी रु. होता.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.