केईएम हॉस्पिटल पुणे येथे अत्याधुनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि सेल्युलर थेरपी युनिटचे उद्घाटन

तारां कित Avatar

पुणे,10 सप्टेंबर 2024 : केईएम हॉस्पिटल पुणे येथे अत्याधुनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) आणि सेल्युलर थेरपी युनिटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणेचे विश्वस्त व रिनल युनिटचे संचालक डॉ.फरूख वाडिया, कन्सल्टंट हेमॅटोलॉजिस्ट व हेमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.कन्नन सुब्रमणियन, कन्सल्टंट -पेडियाट्रिक हेमॅटो -आँकोलॉजी डॉ.सरिता कोकणे,केईएम हॉस्पिटल पुणेचे वैद्यकीय संचालक झक्सेस कोयाजी, प्रशासक शिरीन वाडिया, वैद्यकीय प्रशासक डॉ.विश्वनाथ येमुल, केईएम हॉस्पिटल सोसायटीचे सदस्य श्रीराम यादव,वरिष्ठ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पिल्ले आणि कर्मचारी सदस्य उपस्थित होते. विशेष करून लहान मुलांसाठी असलेल्या या युनिटमध्ये कर्करोगजन्य आणि कर्करोगजन्य नसलेले विकार आणि अनुवांशिकरित्या भिन्न असलेले (ॲलोजेनिक) तसेच ऑटोलॉगस प्रत्यारोपण या सेवा प्रदान केल्या जाणार आहेत.

 

केईएम हॉस्पिटल पुणे येथील कन्सल्टंट हेमॅटोलॉजिस्ट आणि हेमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.कन्नन सुब्रमणियन म्हणाले की, हे युनिट विशेषत: बाल रूग्णांसाठी तयार करण्यात आले असून येथे प्रौढ रूग्णांवर देखील उपचार करण्याची क्षमता आहे.

 

हे युनिट ल्युकेमिया,लिम्फोमा,मायलोमा,थॅलेसेमिया,ऍप्लास्टिक ॲनिमियाबरोबर इतर प्राथमिक रोगप्रतिकारक विकारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना सेवा प्रदान करेल.

 

या अत्याधुनिक स्पेशालिटी युनिटमध्ये स्टेम सेल हार्वेस्ट,स्टोरेज,इन्फ्युजन या बीएमटीशी संबंधित सर्व प्रक्रिया एकाच छताखाली केल्या जातील. या सुविधेला मल्टीस्पेशालिटी सेवांचा भक्कम आधार आहे.

 

डॉ.कन्नन पुढे म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या युनिटमध्ये रक्ताशी संबंधित विकारांवर उपचार करताना एकंदर आरोग्य आणि कल्याणासाठी हेमॅटोलॉजिस्ट,आँकोलॉजिस्ट, प्रशिक्षित परिचारिका आणि कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. हेमॅटोलॉजी विभागाबरोबरच हे नवीन युनिट रक्ताशी संबंधित सर्व विकारांचे निदान आणि उपचार करण्याची आमची क्षमता प्रतिबिंबित करते.

 

केईएम हॉस्पिटल पुणेचे विश्वस्त व रिनल युनिटचे संचालक डॉ.फारूख वाडिया म्हणाले की, हे युनिट सुरू करणे हा आमच्या हॉस्पिटलसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे युनिट म्हणजे बहुविभागीय साहाय्यासह अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सर्व सेवा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

 

बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया आहे,ज्यामध्ये खराब झालेल्या अस्थिमज्जाऐवजी निरोगी अस्थिमज्जा किंवा स्टेम सेल रोपित केले जातात. आपली प्रतिकारशक्ती आणि एकंदर आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या निरोगी रक्तपेशी निर्माण करण्याची शरीराची क्षमता पुन्हा कायम राखण्यासाठी ही प्रक्रिया म्हणजे एक आशे

चा किरण आहे.

Tagged in :

तारां कित Avatar