मुंबई, सप्टेंबर ९, २०२४: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीने आपली नवीन मोहिम लाँच केली आहे, ज्यामध्ये क्रिकेटर रिषभ पंत आहे. या मोहिमेमधून जीवनातील आव्हाने व अनिश्चिततांवर मात करण्यासाठी सुसज्ज असण्याचे महत्त्व दिसून येते, ज्यामुळे व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांसाठी टर्म प्लॅन्स महत्त्वपूर्ण संरक्षण कवच बनले आहेत.
मोहिमेची जाहिरात प्रेरणादायी कथानकाला सादर करते, ज्यामध्ये रिषभ पंतच्या बाऊंसबॅक प्रवासाला दाखवण्यात आले आहे. जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे की रिषभ जीवनातील अनपेक्षित क्षणांना, तसेच त्याच्या बालपणीच्या महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा देतो, जेथे एका धक्क्यामधून बाहेर पडण्यासाठी त्याच्या आईचे शब्द त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरले होते. कथानक वर्तमान स्थितीकडे येते, जेथे उत्तमरित्या सुसज्ज रिषभ आत्मविश्वासाने जगाचा सामना करतो. यामधून दूरदृष्टी व नियोजनासह प्रत्येक आव्हानावर मात करता येऊ शकते, हे दिसून येते, जे अगदी जीवन विमा संकटाच्या काळात आर्थिक सुरक्षितता देण्यासारखे आहे.
रिषभ पंतचा एचडीएफसी लाइफसोबतचा सहयोग गेल्या वर्षभरात अधिक प्रबळ झाला आहे. मैदानावर व मैदानबाहेरील त्याचा प्रवास ब्रँडचे मूलभूत तत्त्व ‘सर उठा के जिओ’ म्हणजेच ‘अभिमान व आत्मविश्वासासह जीवन जगा’शी संलग्न आहे.
सातत्यपूर्ण सहयोगाबाबत मत व्यक्त करत रिषभ पंत म्हणाला, “एचडीएफसी लाइफसोबत प्रवास अविश्वसनीय राहिला आहे. ही मोहिम माझ्या मनाच्या खूप जवळ आहे, कारण त्यामधून आव्हानांवर मात करत जोमाने पुनरागमन करण्याचे महत्त्व दिसून येते. एचडीएफसी लाइफ व्यक्तींना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याबाबत सक्रिय राहण्यास सतत प्रेरित करते आणि मला या प्रयत्नाचा भाग असण्याचा अभिमान वाटतो.”
एचडीएफसी लाइफ येथील चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि ग्रुप हेड स्ट्रॅटेजी विशाल सुभरवाल या मोहिमेच्या महत्त्वाबाबत सांगताना म्हणाले, “रिषभ पंतची बाऊंसबॅक गाथा देश म्हणून आपल्याला प्रेरित करते. भारतात विमाकृत व्यक्तींचे प्रमाण खूप कमी आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही व्यक्तींना स्वत:चे भविष्य सुरक्षित करण्यासोबत त्यांच्या प्रियजनांचे संरक्षण करण्याला प्राधान्य देण्यास प्रेरित करण्याची आशा व्यक्त करतो. आमचा भावनिकदृष्ट्या संलग्न होण्यासोबत विश्वसनीय सुरक्षितता कवच म्हणून जीवन विम्याच्या महत्त्वाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचा देखील मनसुबा आहे.”
दक्षिण आशियामधील लिओ बर्नेटचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर विक्रम पांडे म्हणाले, “जीवन अनपेक्षित असू शकते. भविष्य सुरक्षित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यशासोबत अपयशांसाठी सुसज्ज असले पाहिजे. एचडीएफसी लाइफसाठी आमची नवीन जाहिरात वास्तविक जीवनातील हिरो रिषभ पंतच्या हृदयस्पर्शी उदाहरणासह हा प्रमुख संदेश देते. रिषभ पंतने आपल्या भविष्यासाठी सर्व विषमतांवर मात केली आहे. आम्ही आशा करतो की, ही जाहिरात आपल्या कुटुंबांच्या भविष्यासाठी नियोजन करणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
ही मोहिम विविध मीडिया प्लॅटफॉर्म्ससह टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट व आऊटडोअरवर उपलब्ध असेल.
टर्म प्लॅन्स सुलभ व सर्वात आवश्यक जीवन विमा प्रकार आहेत. हे प्लॅन्स निश्चित प्रीमियमच्या बदल्यात विशिष्ट मुदतीसाठी आर्थिक कव्हरेज देतात, ज्यामधून तुमच्या अनुपस्थितीत प्रियजन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असण्याची खात्री मिळते. हे कव्हरेज त्यांना विविध खर्चांचे व्यवस्थापन करण्यास आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत करू शकते. एचडीएफसी लाइफ १ कोटी रूपयांच्या संरक्षणासाठी प्रतिदिन फक्त २१ रूपयांपासून# सुरू होणारे टर्म इन्शुरन्स प्लॅन्स ऑफर करते. कंपनी अतिरिक्त कव्हरेज आणि रिटर्न ऑफ प्रीमियम# (आरओपी) ऑप्शनसाठी अतिरिक्त राइडर# पर्याय देखील देते. आर्थिक वर्ष २४ मध्ये एचडीएफसी लाइफने ९९.५० टक्के वैयक्तिक मृत्यू दावे निकाली काढले, ज्यामधून पॉलिसीधारकांप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते. #अटी व नि
यम लागू.