Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबायरने भारतातील पुनरुत्पादक शेतीचे सकारात्मक फायदे दाखवण्यासाठी लाँच केले फॉरवर्ड फॉर्म 

बायरने भारतातील पुनरुत्पादक शेतीचे सकारात्मक फायदे दाखवण्यासाठी लाँच केले फॉरवर्ड फॉर्म 

 

 

• संशोधनाच्या मदतीने पुनरुत्पादक शेती प्रक्रियांचे आधुनिकीकरण

• शेतीचे भविष्य पानिपत येथे आकाराला येत आहे

• शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जागतिक पातळीवर नेटवर्क.

 

पानिपत/नवी दिल्ली सप्टेंबर 18, २०२४- बायर कंपनीने त्यांचा बायर फॉरवर्ड फार्मिंग हा जागतिक पातळीवरचा उपक्रम भारतात लाँच केला आहे. जगभरात असलेल्या २९ फॉरवर्ड फार्मसपैकी हा सर्वात नवीन आहे. बायर फॉरवर्ड फॉर्म च्या माध्यमातून भारतात नावीन्यपूर्ण शेती करण्याच्या पद्धती तयार करण्यात आल्यापासून त्या भारतातील जवळपास दीड कोटी छोट्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. विशेषतः तांदूळ उगवणाऱ्या शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून पुनरुत्पादक शेतीचा जास्तीत जास्त प्रचार करण्यात आला आहे.

बायर च्या सस्टेनेबिलिटी अँड स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट्स विभागाच्या प्रमुख नताशा सँटोस म्हणाल्या, “शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन करणे हे आमचं उद्दिष्टच आहे. जागतिक अन्नसुरक्षा अत्यंत आघाडीवर असलेल्या भारतात बायर फॉरवर्ड फार्मिंग आणताना आम्ही अतिशय उत्सुक आहोत. स्थानिक शेतकऱ्यांचा विकास करताना करण्याबरोबरच, शेतकी उत्पादकता, शाश्वतता, आणि अन्नसुरक्षा यांचा विकास करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.”

 

डायरेक्ट सीडेड राइस: पुनरुत्पादक शेतीसाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन

बायर साठी, पुनरुत्पादक शेती म्हणजे मातीच्या आरोग्य सुधारणारं आणि परिणामांवर आधारित पीक उत्पादन मॉडेल आहे. हवामान बदलाचा सामना, जैवविविधतेचं रक्षण पाण्याची बचत, आणि उत्पन्न वाढवणं या मुख्य उद्दिष्टांसह प्रतिकारशक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे. शेवटी, पुनरुत्पादक पद्धतींच्या संयोजनाचं शेतकरी आणि त्यांच्या समुदायांचं सामाजिक आणि आर्थिक कल्याण हेच उद्दिष्ट आहे.

पुनरुत्पादक शेतीला भारतात खूप वाव आहे. विशेषतः तांदूळ लागवडीमध्ये. कारण भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आहे. आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि शाश्वत अशी तांदूळ लागवड प्रणाली विकसित करण्याची गरज आज अधिक महत्त्वाची ठरली आहे. तांदूळ उत्पादनावर हवामान बदलाचा परिणाम होतो, हवामान बदलातही तांदळाचा मोठा वाटा आहे. बायरची डायरेक्ट सीडेड राइस(DSR) प्रणाली हे पुनरुत्पादक शेतीचं अतिशय सर्वसमावेशक आणि ठोस उदाहरण आहे. DSR, मातीच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणं, पाण्याचा वापर कमी करणं, आणि हवामान बदलाला प्रतिकारशक्ती वाढवणं यांसारख्या पुनरुत्पादक शेतीच्या जवळजवळ सर्व परिणामांवर लक्ष केंद्रित करतं.

पाण्यात भिजवलेल्या रोपवाटिका पद्धतीतून DSR कडे वळल्यास शेतकऱ्यांना पाण्याचा वापर ३०-४० टक्क्यांनी कमी करण्यास, हरितगृह वायू उत्सर्जन (GHG) ४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास, आणि दुर्मिळ आणि महागड्या मजुरीवर अवलंबून राहणं हे सर्व ४०-५० टक्क्यांनी कमी करण्यास मदत होऊ शकते. फक्त भारतासाठी, यामुळे २०४० पर्यंत प्रति वर्ष ८.२ कोटी मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन कमी होण्याची आणि पाण्याच्या वापरात १६.७ घनमीटरपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. DSR प्रणाली बायरच्या पुनरुत्पादक शेतीच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन करता येईल आणि अधिक पुन:संचय करता येईल

 

बायरच्या डायरेक्टएकर्स या फ्लॅगशिप प्रकल्पाद्वारे, बायर शेतकऱ्यांना एक टेलर्ड पीक प्रणाली देत आहे. त्यात उच्च दर्जाची बियाणं, पीक संरक्षण, डिजिटल साधनं, मेकॅनायझेशन सर्व्हिसेस आणि शेतीच्या विविध अडचणींवर असलेल्या उपायांचा समावेश आहे. हे प्रयत्न सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे चालवले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना पुनरुत्पादक शेतीवर लक्ष केंदित करून नफा मिळविणारं तांदळाचं पीक घेता येईल याची खात्री केली जाते.

गेल्या वर्षी, डायरेक्ट एकर्स कार्यक्रमाद्वारे ५,००० भारतीय शेतकऱ्यांनी ८६०० हेक्टर क्षेत्रावर यशस्वीपणे डायरेक्ट सीडेड राइसची लागवड केली आहे. २०३० पर्यंत डायरेक्टएकर्स कार्यक्रमाद्वारे भारतातील १० लाखांहून अधिक लघु शेतकऱ्यांना मदत करण्याचा बायरचा उद्देश आहे. तसंच फिलिपाइन्स पासून सुरुवात करून डायरेक्टएकर्स इतर तांदूळ उत्पादक आशियाई देशांमध्ये सादर करण्याचंही नियोजन आहे.

 

भारतीय शेतीसाठी टेलर्ड सोल्युशन्स

भारतातील पहिल्या बायर फॉर्वर्ड फार्मचे भागीदार वेद प्रकाश सैनी यांनी या भागीदारीबद्दल आपला आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, “बायर फॉर्वर्डफार्मच्या माध्यमातून सादर केलेल्या पुनरुत्पादक शेती पद्धतीमुळे माझ्या उत्पन्नात आणि उपजीविकेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याबरोबरच शेती करण्याची प्रक्रिया अधिक शाश्वत होईल अशी मला आशा आहे. डायरेक्ट सीडेड राइस आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीकांच्या आरोग्यात वाढ, पाण्याचा वापर कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. शेतीसाठी एक सशक्त आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत मी हे फायदे घेण्यास अतिशय उत्सुक आहे. ”

भारतातील बायर फॉरवर्ड फार्म १८ हेक्टरमध्ये पसरलेले आहे. ते छोट्या शेतकऱ्यांसाठी डिझाइन केलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींच्या एकत्रीकरणाची ओळख करून देते. या फार्ममध्ये खालील पद्धतींचा समावेश आहे:

 

डायरेक्ट सीडेड राइस(DSR) पीक प्रणाली: पारंपरिक तांदूळ लागवडीसाठी एक शाश्वत पर्याय आहे. त्यामुळे जमिनीची खालची हालचाल कमी होते. पाण्याचा वापर कमी होतो आणि मातीच्या आरोग्यात सुधारणा होते.

• नावीन्यपूर्ण तण व्यवस्थापन: पीकांचं आरोग्य राखून रासायनिक तणनाशकांवरील अवलंबित्व कमी करणारं प्रगत तण नियंत्रण धोरण

• कस्टमाइज्ड कृषी प्रणाली: विविध हवामान परिस्थिती आणि जमिनीच्या प्रकारांसाठी टेलर्ड सोल्यूशन्स, पीक उत्पादन आणि मातीच्या आरोग्यात सुधारणा.

• कार्बन शेती: मातीमध्ये कार्बन पकडून ठेवण्याचं आणि साठवण्याचं उद्दिष्ट असलेल्या पद्धती, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि मातीची सुपीकता वाढवण्यासाठी योगदान देतात.

• पोषण आणि जल व्यवस्थापन: शेताच्या उत्पादनक्षमतेत वाढ आणि पर्यावरणीय परिणाम कमी करणं तसंच पाण्याच्या कार्यक्षमतेचं ऑप्टिमायझेशन करण्यासाठी आणि पोषक तत्त्वांचा वापर करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान.

• वर्मीकंपोस्ट आणि आयओटी: मातीच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी वर्मी कंपोस्टचा वापर, तसेच कृषी प्रक्रियेचं अचूक निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आयओटी तंत्रज्ञानाचा समावेश.

• सिंचन आणि ड्रोन तंत्रज्ञान: पाण्याच्या वापराचं ऑप्टिमायझेशन आणि अचूक पीक व्यवस्थापनासाठी नावीन्यपूर्ण सिंचन आणि ड्रोन तंत्रज्ञान.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments