Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिंद्रातर्फे वार्षिक सारथी अभियान पुढे सुरू – ट्रक चालकांच्या मुलींना १,००० नव्या...

महिंद्रातर्फे वार्षिक सारथी अभियान पुढे सुरू – ट्रक चालकांच्या मुलींना १,००० नव्या स्कॉलरशिप्स देणार

१०,००० रुपये रकमेच्या १,००० नव्या स्कॉलरशिप्स गुणवंत अर्जदारांना (ट्रक चालकांच्या मुली) ज्या चांगला अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक वर्ष २५ मध्ये उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना प्रदान केल्या जाणार.

 

· २०१४ मध्ये लाँच झाल्यापासून महिंद्रा सारथी अभियानांतर्गत आतापर्यंत १०,०२९ ट्रक चालकांच्या मुलींना स्कॉलरशिप्स देण्यात आल्या आहेत.

 

· या स्कॉलरशिप्स अर्जदाराच्या वडिलांकडे महिंद्राचे व्यावसायिक वाहन असले किंवा नसले, तरी दिल्या जातात.

 

 

 

पुणे, १७ सप्टेंबर २०२४ – महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन (एमटीबीडी) या महिंद्रा समूहातील विभागाने ड्रायव्हर्स डे २०१४ साजरा करण्यासाठी आज ट्रक चालकांच्या मुलींसाठी महिंद्रा सारथी अभियानांतर्गत स्कॉलरशिप योजना जाहीर केली आहे. या प्रकल्पाद्वारे महिंद्रा ट्रक चालकांच्या गुणवंत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी हातभार लावत त्यांचे आयुष्य उंचावण्यासाठी बांधिल आहे.

 

 

 

महिंद्रा ही अशा प्रकारचा उपक्रम सुरू करून १०,००० रुपयांची स्कॉलरशिप आणि सोबत त्यांच्या कामगिरीची दखल घेणारे प्रमाणपत्र देणारी पहिलीच कंपनी ठरली आहे. हा उपक्रम ट्रक चालक समूहाच्या कल्याणी सध्या महिंद्र ट्रक अँड बस विभागातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. २०१४ मध्ये महिंद्रा सारथी अभियानासह त्याची सुरुवात करण्यात आली होती. हा उपक्रम पॅन भारतातील ७५ पेक्षा जास्त ट्रान्सपोर्ट केंद्रांद्वारे सुनिश्चित, पारदर्शक आणि स्वतंत्र प्रक्रियेद्वारे राबविला जाणार आहे. आतापर्यंत १०,०२९ तरुण मुलींना या स्कॉलरशिप्सचा फायदा झाला असून, त्यांना आपल्या आकांक्षांचा ध्यास घेणे शक्य झाले आहे.

 

 

 

श्री. विनोद सहाय, अध्यक्ष- ट्रक्स, बसेस, सीई, एयरोस्पेस आणि डिफेन्स व्यवसाय – महिंद्रा अँड महिंद्रा लि. ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्ड, महिंद्रा समूहाचे सदस्य म्हणाले, ‘महिंद्रा सारथी अभियानाच्या माध्यमातून आम्ही स्कॉलरशिप्स पुरवण्याबरोबरच तरुण मुलींमध्ये नवी आशा निर्माण करत आहोत व त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्याचे दरवाजे खुले करत आहोत. ट्रक चालक भागीदारांच्या मुलींना शैक्षणिक संधी मिळवून देत, त्यांचे आयुष्य बदलवण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करत आम्ही सक्षम स्त्रियांची पिढी तयार करत आहोत, जी आपला समाज व अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर योगदान देईल.’

 

महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या व्यावसायिक वाहन विभागाचे व्यवसायप्रमुख श्री. जलाज गुप्ता म्हणाले, ‘महिंद्रा सारथी अभियानाद्वारे आम्ही ट्रक चालकांच्या मुलींचे आयुष्य उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहोतच, शिवाय नवीन संधी आणि प्रेरणेची संस्कृती रुजविण्यासाठी आग्रही आहोत. या उपक्रमाच्या मदतीने व्यावसायिक वाहन क्षेत्रात आणखी स्त्री वर्गास काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि पर्यायाने मुलींना त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याची व उद्याचे लीडर बनण्याची संधी देणारा जास्त सामर्थ्यवान, न्याय्य समाज उभारण्याची आमची बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे.’

 

 

 

कंपनीने या स्कॉलरशिपसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक मुलीचा सत्कार करण्याचे ठरविले असून, त्यांच्या खात्यात थेट १०,००० रुपये जमा केले जातील व त्यांच्या कामगिरीची दखल घेणारे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. हा सत्कार समारंभ फेब्रुवारी ते मार्च २०२५ दरम्यान महिंद्रा ट्रक अँड बस लीडरशिपच्या निवडक ठिकाणी आयोजित केला जाणार असून, त्यामध्ये ट्रक चालकांच्या मुलींना १,००० स्कॉलरशिप्स दिल्या जातील.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments