Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*पिंपरी विधानसभेतील गणेश उत्सव मंडळांची गणेश आरतीसाठी इंजि.देवेंद्र तायडे यांना पहिली पसंती*

*पिंपरी विधानसभेतील गणेश उत्सव मंडळांची गणेश आरतीसाठी इंजि.देवेंद्र तायडे यांना पहिली पसंती*

पिंपरी:- आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. याच सणांपैकी गणेश चतुर्थी अथवा गणेश उत्सव हा देखील एक महत्त्वाचा सण आहे आहे. गणेशोत्सव हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. या सणाला संपूर्ण देशात साजरे केले जाते परंतु महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात गणेशोत्सवा विषयी विशेष आकर्षण आहे. म्हणूनच या सणाची लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात गणेश उत्सव २०२४ सध्या संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये उत्साहात साजरा होत आहे. पिंपरी विधानसभेतील इंजि. देवेंद्र तायडे यांना गणेश मंडळांनी आरतीसाठी आवर्जून बोलवले.

खऱ्या अर्थाने गणेश मंडळे ही ज्यांनी आपल्याला भरभरून आर्थिक मदत केली यांना गणेश आरतीसाठी बोलवलं जातं ही आत्तापर्यंतची परंपरा आहे. परंतु पहिल्यांदाच इंजि.देवेंद्र तायडे यांच्याकडून कुठल्याही प्रकारची वर्गणी किंवा देणगी ची अपेक्षा न ठेवता आरतीचा बहुमान दिला त्याबद्दल इंजि. देवेंद्र तायडे सर्व मंडळाचे आभारी व्यक्त केले.

सालाबादप्रमाणे गणेशोत्सवामध्ये विविध मंडळे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात आणि त्यांनी यावर्षीही अशा प्रकारे पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये विविध उपक्रम राबवले त्याबद्दल मंडळाचे तायडे यांनी भरभरून कौतुक केले येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो अशी गणपती चरणी प्रार्थना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments