पुणे २० सप्टेंबर २०२४: पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठाचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना ३६ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. पी. डी. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. पी. डी. पाटील यांच्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने श्री. सुरेश कलमाडी आणि मीरा कलमाडी यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिव्हल हा एक प्रसिद्ध सांस्कृतिक उपक्रम आहे. देशभरात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा जपत या उत्सवाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि कला, संगीत व परंपरांचे अनोखे दर्शन घडविणारा हा उत्सव पुण्याचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित करतो.
डॉ. पी. डी. पाटील हे एक दूरदर्शी नेते आहेत. त्यांच्या शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या प्रगतीसाठीच्या अथक वचनबद्धतेमुळे पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ देशातील एक नामांकित संस्था म्हणून नावारुपाला आली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, विदयापीठाने नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम, आधुनिक अध्यापन पद्धती आणि अत्याधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध केल्या असून, शिक्षणक्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. डॉ. पी. डी. पाटील यांनी जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने संस्थेचा दर्जा तर उंचावलाच आहे, त्याचवेळी असंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणाही देतात. डॉ. पाटील यांचे योगदान शिक्षणक्षेत्राच्याही पलीकडे आहे. प्रगत वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालये उभारून आरोग्यसेवेत क्रांती घडवून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे उत्तम रुग्णसेवा आणि दर्जेदार आरोग्यसेवेची सुलभता वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील रुग्णांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे. डॉ. पाटील यांचे समाजसेवेसाठीचे समर्पणही तितकेच प्रशंसनीय आहे. वंचितांना मदत करण्यासह विविध सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने अनेक परोपकारी उपक्रमांना ते पाठिंबा देत असतात.
या पुरस्कार सोहळ्या दरम्यान डॉ. पी.डी. पाटील म्हणाले, “जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझा मोठा सन्मान आहे. मी अतिशय नम्रतेने त्याचा स्वीकार करतो. माझ्या कामाची दखल घेऊन दिलेला हा पुरस्कार माझी जबाबदारी वाढवतो. शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजसेवेत माझे प्रयत्न यापुढेही सुरू ठेवण्याची जबाबदारी मी निरंतर निभावेन. सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केल्याबद्दल मी श्री. सुरेश कलमाडी आणि श्रीमती मीरा कलमाडी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ज्यांच्या कलात्मक दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला निखळ आनंद दिला आहे, अशा शि.द. फडणीस यांच्या योगदानाचीही मी प्रशंसा करतो. वैविध्य आणि उत्कृष्टता यांचा उत्तम मेळ घालणाऱ्या समुदायाचा भाग बनणे हा एक विशेषाधिकार आहे, असे मला वाटते.”
हा जीवनगौरव पुरस्कार डॉ. पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्याचा आदर्श सर्वांपुढे उभा केला आहे. जो पुढील पिढ्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा देतो. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि समर्पण भविष्याला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावते,ज्यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजकल्याणावर कायमस्वरूपी प्रभाव पडतो. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ डॉ. पी. डी. पाटील यांची मूल्ये आणि दूरदृष्टी टिकवून ठेवण्यासाठी, उत्कृष्टता, नावीन्य आणि समाजाच्या सेवेला चालना देणारे उपक्रम पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे.


