Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedथापर इन्स्टिट्युट कौन्सिलिंग सेल (टीआयसीसी) तर्फे ल्युमिनेसेन्स 2024 चे यशस्वी आयोजन प्रसिध्द...

थापर इन्स्टिट्युट कौन्सिलिंग सेल (टीआयसीसी) तर्फे ल्युमिनेसेन्स 2024 चे यशस्वी आयोजन प्रसिध्द कवियित्री नायाब मिधा यांची विशेष उपस्थिती

पटियाला,25 सप्टेंबर 2024 : प्रगतीशील शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रसिध्द असलेल्या थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नोलॉजी (टीआयईटी) तर्फे नुकतेच ल्युमिनेसेन्स 2024 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम थापर इन्स्टिट्युट कौन्सिलिंग सेल (टीआयसीसी) ने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करणे हा आहे. इल्युमिनेट,एम्पॉवर,थ्राईव्ह या संकल्पनेसह या कार्यक्रमाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवली आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि शैक्षणिक वाढीसाठी आवश्यक साधनांसह सक्षम केले.

 

थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नोलॉजी (टीआयईटी) आपल्या संस्थात्मक प्राधान्यांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे मानसिक कल्याण अग्रस्थानी ठेवते. थापर इन्स्टिट्युट कौन्सिलिंग सेल (टीआयसीसी) द्वारे, संस्थेने एक मजबूत समर्थन प्रणाली तयार केली आहे,ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक,शैक्षणिक जीवनातील दबावांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक संसाधने,समुपदेशन आणि समर्थन उपलब्ध आहे. द लँडसेटच्या अनुसार दरवर्षी जगभरात 7 लाख हून अधिक लोकं आत्महत्या करतात आणि भारतात यापैकी भारतात याचे प्रमाण 1,70,000 आहे,तर जागतिक नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌‍ ब्युरोच्या मते विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे,त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी सक्रीय पाऊले उचलण्याची तातडीची गरज आहे.

 

कॅम्पस संस्कृती विकसित करण्यावर आणि मानसिक आरोग्यावर आपले धोरणात्मक लक्ष केंद्रित करत ल्युमिनेसेन्ससारख्या उपक्रमांच्या माध्यमातून टीआयईटी या मोठ्या समस्येचा सामना करत आहे.संस्था विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक साहाय्य देऊन शैक्षणिक कामगिरी व्यतिरिक्त भावनिक लवचिकता विकसित करण्यास सक्षम करत आहे. थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नोलॉजी (टीआयईटी) ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी सहाय्यक व भरभराटीचे वातावरण तयार करण्यास प्रयत्नशील आहे.या अभिनव दृष्टीकोनामुळे टीआयईटी ही मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक बनली आहे.

 

टीआयईटीचे संचालक आणि थापर स्कुल ऑफ लिबरल आर्टस्‌‍ ॲन्ड सायन्सेसचे अधिष्ठाता प्रा.पद्मकुमार नायर म्हणाले की, आमच्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हाच त्यांच्या सर्वांगीण यशाचा पाया आहे,यावर आमचा ठाम विश्वास आहे.आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेच्या पलीकडे जाऊन मानसिक कल्याणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. ल्युमिनेसेन्स 2024 सारखे उपक्रम आणि आमच्या कौन्सिलिंग सपोर्ट सिस्टिम द्वारे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक भरभराटीसाठी योग्य वातावरण निर्माण करत आहोत.आमचे ध्येय हे केवळ तरूणांना शिक्षण देणे नसून चांगल्या उद्दिष्टाने नेतृत्व करणाऱ्या तरूणांना सक्षम करणे आहे.

 

या कार्यक्रमात तीन वेगवेगळ्या व अनोखा अनुभव देणाऱ्या संकल्पना होत्या. कामफेस्ट अंतर्गत विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये स्वत:ला जाणून घेणे,शिकण्यास प्रोत्साहन मिळणे अणि सर्जनशीलपणे जोडण्याची संधी मिळाली.ख्याल या ओपन माईक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक अभिव्यक्ती सादर केली. प्रख्यात कवियित्री नायाब मिधा यांनी मुस्कुराओ हे सादरीकरण या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते,ज्यात त्यांनी ओळख,चिकाटी आणि मानवतेच्या अनुभवांवर आधारित आत्मनिरीक्षण करणाऱ्या भावनिक कविता सादर केल्या.

 

नायाब मिधा यांनी टीआयईटीच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आणि ही संधी दिल्याबद्दल टीआयईटीचे आभार मानले. अशा कार्यक्रमांमध्ये मानसिक आरोग्यावर भर देणे ही आजच्या काळात मोठी गरज असून, टीआयईटीने या दिशेने स्तुत्य पाऊल उचलले आहे,असे त्या म्हणाल्या.

 

युवराज गुप्ता आणि कीर्तवीर कौर खरौड यांच्या नेतृत्वाखालील 170 सदस्यांच्या मेंटल हेल्थ स्टुडंट ॲम्बेसिडर्सच्या टीमने आयोजित केलेल्या टीआयसीसीच्या व्यवस्थापक (विद्यार्थी समुपदेशक) डॉ.सोनम दुल्लत यांच्या मार्गदर्शनाखाली ल्युमिनेसेन्स 2024 कार्यक्रमात करूणा आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व वाढविणारे वातावरण कॅम्पसमध्ये तयार करण्यात यश मिळविले आहे.

 

ल्युमिनेसेन्स 2024 हा कार्यक्रम केवळ जागृतीचा उत्सव नव्हे तर,ही एक जागृत समाजाप्रती केली जाणारी एक चळवळ आहे,जिथे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यास सक्षम केले जाते.

थापर विद्यापीठ आणि कार्यक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या. https://www

.thapar.edu/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments