पुणे, दि १२: सेना चिकित्सा संगठन केंद्र तथा कॉलेज लखनौ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत २०२४-२५ साठी कार्यरत सैनिक (सर्व्हिसमन), माजी सैनिक, युद्ध विधवा आणि सेवारत जवानांचे भाऊ तसेच संरक्षण सुरक्षा कॉर्प्स मधील कर्मचाऱ्यांचे पुत्र, बंधू यांच्यासाठी विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
नियमित संवर्गातील सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) या पदाची भरती प्रक्रिया ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तर ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अग्निवीर ऑफिस असिस्टंट (लिपिक), अग्निवीर स्टोअर कीपर टेक्निकल (एसकेटी), अग्निवीर जनरल ड्युटी (ॲम्ब्युलन्स असिस्टंट) आणि ड्रायव्हर मिलिटरी व्हेईकल (डीएमव्ही), अग्निवीर ट्रेड्समन- शेफ, कारभारी व ड्रेसर (१० वी पास) या पदासह संगितकार (खुला प्रवर्ग), अग्निवीर ट्रेड्समन हाऊस कीपर (८ वी पास) या पदांचीदेखील भरती आयोजित करण्यात येणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज uhq2024@joinamc.in या ईमेल वर १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करून नोंदणी करावी. उमेदवारांना तात्पुरत्या स्वीकृती ई- मेलद्वारे सूचित केल्या जाणाऱ्या तारखेला सेना चिकित्सा संगठन केंद्राचे स्टेडियम, लखनौ-रायबरेली रोड येथे भरती प्रक्रियेसाठी हजर रहावे. अपूर्ण कागदपत्रे असणारे उमेदवार रॅलीत भाग घेण्यास पात्र असणार नाहीत.
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
0000