महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्ष पदाचा*  *राजन पाटील यांनी स्विकारला पदभार*

तारां कित Avatar

 

 

पुणे, दि. १ : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदाचा नूतन अध्यक्ष श्री. राजन पाटील यांनी राज्य सहकारी परिषदेच्या कार्यालयात पदभार स्विकारला.

 

यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, अपर आयुक्त व विशेष निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक राजेश सुरवसे, उपनिबंधक किरण सोनवणे उपस्थित होते.

 

सहकारी चळवळीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे, सहकारी संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी मार्ग व पर्याय सुचविणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे यांची शिफारस करणे आदी बाबी सहकारी परिषदेकडून करण्यात येतील, असे श्री. राजन यावेळी म्हणाले.

0000

Tagged in :

तारां कित Avatar