मुंबई, 4 ऑक्टोबर, 2024 : भारतातील अग्रगण्य पर्यावरण-अनुकूल पेंट्स कंपनी आणि US$ 24 अब्ज जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असलेल्या जेएसडब्ल्यू पेंट्सने आज त्यांच्या सजावटीच्या पेंट्ससाठीच्या मोहिमेचे अनावरण केले.
‘खूबसूरत सोच’ ही मोहीम जेएसडब्ल्यू पेन्ट्सच्या ‘थिंक ब्युटीफुल’ क्षमतेवर भर देते. या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर आलिया भट्ट आणि आयुष्मान खुराणा प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी, तसेच जेएसडब्ल्यू पेंट्सच्या रंगांसह अभिव्यक्तीच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आमंत्रित करतात. ही नवीन मोहीम टेलिव्हिजन चॅनेल, डिजिटल, OOH आणि इतर प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.
आलिया भट्ट आणि आयुष्मान खुराणाची खेळकर ऊर्जा प्रेक्षकांना त्यांची राहती जागा रंगीबेरंगी करण्यास मदत करते. चित्रपटाचा साउंडट्रॅक गुलजार यांनी केला आहे, ज्यामुळे तो प्रेक्षकांसाठी दृश्य आणि श्रवणाचा उत्तम अनुभव निर्माण करतो. TBWA\India द्वारे संकल्पित ही मोहीम जेएसडब्ल्यू पेंट्सच्या पर्यावरणासाठी अनुकूल पेंट्सच्या विविध श्रेणींचे प्रदर्शन करते.
जेएसडब्ल्यू पेन्ट्सने दक्षिणेतील बाजारपेठेसाठी दुल्कर सलमान याची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या मोहिमेसाठी करण्यात आलेल्या चित्रपटात आलिया भट्ट आणि दुल्कर सलमान आहेत.
मोहिमेवर भाष्य करताना जेएसडब्ल्यू पेंट्सचे जॉइंट एमडी आणि सीईओ श्री. ए.एस. सुंदरेसन म्हणाले, “आमच्या ‘खूबसूरत सोच’ मोहिमेचे अनावरण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ही मोहीम लोकांना त्यांच्या घरात परिवर्तन घडविणाऱ्या सुंदर विचारांची अमर्याद क्षमता शोधण्यात मदत करेल. ग्राहकांनी रंगाच्या पलीकडे जात थीम, डिझाइन्स, आकांक्षा, अनुभव याकडे पाहावे आणि त्याला जीवनाचा एक भाग बनवावा, अशी आमची इच्छा आहे.”
गोविंद पांडे, सीईओ, TBWA\India म्हणाले, “आधी कधीच मिळाले नसतील, इतके विविध पर्याय आता या नवीन वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या जेएसडब्ल्यू पेन्ट्समुळे मिळणार आहेत. यामुळे आपले घर सजविण्याबाबत आपले जे काही विचार असतात, ते यामुळे प्रत्यक्षात येऊ शकतात. हा चित्रपट गृहिणींच्या या पिढीशी आणि त्यांच्या जोडीदारांशी जोडलेला आहे, जे यासाठी नवीन कल्पना व रंगांचा विचार करतात.”
रसेल बॅरेट, सीसीईएक्सपो, टीबीडब्ल्यूए\इंडिया म्हणाले, “नवनवीन कल्पना आणि आकर्षक रंगसंगती या आधारावर जेएसडब्ल्यू पेंट्स कार्यरत आहे. या चित्रपटामुळे भारतातील प्रत्येक घरमालक आपल्या विविध कल्पनांनी घर जिवंत, तसेच आकर्षक करण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यांची कल्पनाशक्ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करू इच्छितो.”


