Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जाधवर इन्स्टिटयूटस्तर्फे जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र...

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जाधवर इन्स्टिटयूटस्तर्फे जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती ; अ‍ॅड. सुभाष मोहिते, कर्नल विनोद मारवाह, डॉ.मिलिंद भोई, युवराज गाडवे पुरस्काराचे मानकरी

पुणे : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् च्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांना गुरुवार, दिनांक १० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

सन्मान सोहळ्यांतर्गत ज्येष्ठ बँकिंग तज्ञ अ‍ॅड.सुभाष मोहिते यांना सहकार क्षेत्रातील पुरस्कार, कर्नल विनोद मारवाह यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार काका हलवाई ग्रुपचे युवराज गाडवे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

 

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सहकार, उद्योग यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी कार्यक्रमाला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

जाधवर परिवारात असलेल्या पंचवीस हजार विद्यार्थी व पालक आणि दीड हजारपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना केजी ते पीजी पर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येते. तसेच ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत शिष्यवृत्तीच्या रुपात दिली जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु अ

सतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments