पुणे, 14 ऑक्टोबर 2024 : पॅरिस येथे नुकतेच पार पडलेल्या 13 व्या कल्चरल ऑलिंपियाड ऑफ परफॉरमिंग आर्ट्स मध्ये पुण्यातील कथक नृत्यांगना नंदिनी कुलकर्णी यांना सुवर्णपदक मिळाले आहे. युनेस्कोच्या अधिपत्याखाली अखिल भारतीय सांस्कृतिक संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंडित बिरजू महाराज यांच्या वरिष्ठ शिष्य श्रीमती शर्मिला शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे वरिष्ठ शिष्य व सहाय्यक हेनरी टुरनिअर हे परीक्षक म्हणून उपस्थित होते.
नंदिनी कुलकर्णी यांनी आपल्या सादरीकरणात शिव चतरंग आणि होरी सादर केली. नंदिनी कुलकर्णी या पंडिता मनिषा साठे आणि मधुरा आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषा नृत्यालय येथे कथक शिकत आहेत.सध्या त्या ललित कला केंद्र पुणे येथे इंटिग्रेटेड एम.ए.इन डान्स या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.
—


