Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुर्लक्षित वारसदार : पुरुष वर्चस्वाविरुद्ध बहिणीचा संघर्ष

दुर्लक्षित वारसदार : पुरुष वर्चस्वाविरुद्ध बहिणीचा संघर्ष

कल्याणी कुटुंबाच्या वादाला आणखी नवे वळण देताना उद्योगपती बाबा कल्याणी आणि गौरीशंकर कल्याणी यांची बहीण सुगंधा हिरेमठ यांनी अविभक्त हिंदू कुटुंबाच्या (एचयूएफ) मालमत्तेचे विभाजन करण्यासाठी पुणे न्यायालयात धाव घेतली आहे. हिरेमठ यांनी अलीकडेच २०१२ मध्ये दाखल झालेल्या मूळ खटल्यात सुधारणा करून स्वत:ला ‘को-पार्सरनर’ (संयुक्त वारस) म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला असून, कौटुंबिक मालमत्तेची फाळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, शीतल कल्याणी यांनी २०१४ मध्ये दाखल केलेल्या फाळणीच्या आणखी एका खटल्यातही हिरेमठ यांनी पुढील प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

आपल्या प्रतिज्ञापत्रात हिरेमठ यांनी म्हटले आहे की, ‘इतकी वर्षे त्यांना कौटुंबिक संपत्ती किंवा कौटुंबिक ‘एचयूएफ’मध्ये कोणतीही भरीव मालमत्ता नसल्याचे भासविण्यात आले. बाबा कल्याणी यांनी २०११ मध्ये वडील डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्याकडून ‘कुटुंबाचा कर्ता’ म्हणून सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांनी सुगंधा हिरमेठ यांना त्यांचा हिस्सा देण्यात येईल, असा विश्वास दिला होता. मात्र, बाबा कल्याणी यांनी कौटुंबिक संपत्तीशी संबंधित सर्व कागदपत्रे स्वत:कडे ठेवली आणि खरे चित्र कधीच उघड केले नाही,’ असा आरोप सुगंधा हिरेमठ यांनी केला आहे.

बाबा कल्याणी यांच्या म्हणण्यावर विसंबून राहिल्याने पुण्यातील कल्याणनगर परिसरातील एका मुख्य भूखंडाशिवाय कल्याणी कुटुंबाच्या तिजोरीत काहीच नाही, असे सुगंधा हिरेमठ यांना वाटत होते. संबंधित भुखंडावर त्यांचे कौटुंबिक घर उभे होते आणि त्यात त्यांची दिवंगत आई राहत होती.

बाबांनी कुटुंबाचा कर्ता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला, असे सुगंधा हिरेमठ यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, जवळच्या संबंधांमुळे आणि प्रतिवादी क्रमांक तीनच्या (बाबा कल्याणी) क्षमतेवर विश्वास असल्याने सुगंधा हिरेमठ यांनी बाबा कल्याणी यांच्यावर जवळजवळ डोळे झाकून विश्वास ठेवला होता. ‘माझा भाऊ, बाबा कल्याणी मला संयुक्त कुटुंबाची मालमत्ता, निधी, संपत्ती आणि गुंतवणुकीतील माझ्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवणार नाही, असा विश्वास होता’ असे सुगंधा हिरेमठ यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सुगंधा हिरेमठ यांच्या पतीच्या नियंत्रणाखाली असलेली ‘हिकल लिमिटेड’ ही कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर त्यांनी या प्रकरणात सखोल माहिती घेतली. हा प्रकार अलीकडेच २०२३ मध्ये घडला होता. त्यावेळी बाबा कल्याणी यांनी सुगंधा हिरेमठ यांच्या कुटुंबाकडून कंपनी हडप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाबा कल्याणी स्वतःशिवाय कोणाच्याही हिताची काळजी घेण्याचा, कोणताही हेतू नव्हता, असे त्यांच्या लक्षात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments