टायटन आय+चे ट्रक, रिक्षा आणि कॅब चालकांमध्ये, तसेच डिलीव्हरी कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता पसरविण्याचे ध्येय
जून २०२४ पासून टायटन आय+ तर्फे भारतातील ९०० पेक्षा जास्त ठिकाणच्या ७,००० चालकांचे स्क्रीनिंग
राष्ट्रीय, 14 ऑक्टोबर २०२४ – भारतीय रस्ते सुरक्षित करण्याच्या संकल्पातून टायटन आय+ या भारतातील आघाडीच्या आयकेयर ब्रँडने रस्त्यावरच्या सर्वांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एका समस्येवर- व्यावसायिक चालकांमधील डोळ्यांच्या समस्येवर उपाययोजना अंमलात आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
या ‘वर्ल्ड साइट डे’च्या निमित्ताने जागतिक स्तरावर दृष्टिदोष आणि डोळ्यांच्या आरोग्याचे महत्त्व यांविषयी जागरूकता पसरवत, टायटन आय+ ने रस्त्यावर जास्त वेळ घालविणाऱ्यांचे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे कसं दुर्लक्ष होतं, याकडे लक्ष वेधले. कंपनीतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये ‘आय टेस्ट मेन्यू’ या कल्पक उपक्रमाचा समावेश आहे. हा उपक्रम कायम फिरतीवर असणाऱ्या ट्रक चालकांसाठी खास तयार करण्यात आला आहे, कारण कामाच्या वेळापत्रकामुळे त्यांचे डोळ्यांकडे सतत दुर्लक्ष होत असते.
चालकांचे नेहमी त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब लक्षात घेऊन टायटन आय+ ने आय केयर सुविधाच त्यांच्यापर्यंत आणण्याचे ठरविले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून टायटन आय+ ने ढाबा किंवा विश्रांतीगृहासारख्या जिथे ट्रक चालकांचा राबता असतो, अशा ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. पर्यायाने त्यांना जेवणा-खाण्याच्या ठिकाणी सहजपणे डोळ्यांची तपासणी करून घेता येणार आहे. कंपनीने या ठिकाणी नेहमीच्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणी ‘आय टेस्ट मेन्यू’ ठेवला असून, हा कल्पक मार्ग चालकांना डोळे तपासून घेण्यासाठी प्रेरणा देईल. हे मेन्यू भिंतीवर लावण्यात आले असून, ते आय टेस्ट प्रमाणे तयार करण्यात आले आहेत. या मेन्यूमधून ऑर्डर देण्यासाठी चालकांनी ‘आय टेस्ट मेन्यू’शी संवाद साधला व त्यांना त्यांचे दृष्टिदोष लगेच दिसून आले.
या उपक्रमाविषयी टायटन कंपनीच्या आयकेयर विभागाचे मार्केटिंग प्रमुख श्री. मनीष कृष्णमूर्ती म्हणाले, ‘दरवर्षी वर्ल्ड साइट डे या निमित्ताने टायटन आय+ साठी डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधण्याची संधी मिळते. या वर्षी आम्ही ‘मेक इंडियन रोड्स सेफ’ ही संकल्पना हाती घेतली आहे, कारण आपले रस्ते त्यावर वाहन चालविणाऱ्यांमुळेच सुरक्षित राहात असतात.’
‘द आय टेस्ट मेन्यू’ फिल्मची निर्मिती ऑग्लिव्हे टीमने केली असून, त्यांच्या कल्पकतेचा आम्हाला अभिमान वाटतो, कारण आम्ही केवळ डोळे तपासणीसाठी टेस्ट उपलब्ध करत नाही, तर लोक जिथे असतात, तिथवर पोहोचून त्यांचे लक्ष वेधून घेत, डोळ्यांच्या तपासणीविषयी त्यांची अनास्था दूर करतो.
ढाब्याच्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये तत्क्षणी आणि मोफत डोळ्यांची तपासणी कुशल नेत्रतज्ज्ञांद्वारे केली जाते. दृष्टिदोष असलेल्या चालकांचे निदान करून त्यांना योग्य प्रकारचा चष्मा, त्यांना हव्या त्या श्रेणीमधून निवडण्याची मुभा दिली जाते. नंतर हा चष्मा सवलतीच्या दरात थेट त्यांच्या घरी पोहोचविला जातो.
‘मेक इंडियन रोड्स सेफ’ या मोहिमेच्या निमित्ताने चालक समाजापर्यंत डोळे तपासणीविषयी जागरूकता निर्माण होत असून, ही मोहीम ७,००० पेक्षा जास्त चालकांपर्यंत पोहोचली आहे. यापुढेही ही मोहीम जास्तीतजास्त चालकांपर्यंच पोहोचणार आहे. टायटन आय+ नम्मा यात्रीसारख्या प्लॅटफॉर्म्ससह काम करत असून, त्याद्वारे डिलीव्हरी भागीदार, रिक्षा चालक आणि कॅब चालक यांसारख्या वाहतूक यंत्रणेतील महत्त्वाच्या घटकांपर्यत मोफत नेत्र तपासणी पोहोचविली जाणार आहे.
अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, भारतातील तीनपैकी एका चालकाची दृष्टी कमकुवत असते आणि त्यामुळे त्यांची सुरक्षितपणे वाहन चालविण्याची क्षमता कमी होते. आकडेवारीनुसार भारतीय रस्त्यांवर होणाऱ्या बहुतेक अपघातांमध्ये मोठ्या वाहनांचे प्रमाण जास्त असून, गेल्या काही वर्षांत २५,००० पेक्षा जास्त अपघात (रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालय, २०२२) आणि १०,००० पेक्षा जास्त मृत्यू (रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालय, २०२२) ट्रक व लॉरीमुळे झाले आहेत. इतकी जोखीम असूनही चालक डोळ्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात, डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. या उपक्रमामध्ये टायटन आय+ ची विविध समाजांमध्ये नेत्रतपासणीविषयी जागरूकता आणि दीर्घकालीन प्रभाव तयार करण्याची बांधिलकी दिसून आली आहे.


