Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्त्रीच्या बुद्धी, गुणवत्ता, अंतर्गत गुणांना महत्व द्या - योगिता साळवी*

स्त्रीच्या बुद्धी, गुणवत्ता, अंतर्गत गुणांना महत्व द्या – योगिता साळवी*

पुणे – ’मुलगी सुरक्षित राहायची असेल तर तिला कायद्याचे ज्ञान द्या,मानसिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ बनवा.
सर्व स्त्रिया शक्तीदायिनीच आहेत.’असे उद्गार दै. तरुण भारत च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी मातृशक्ती, पुणे आयोजित महाभोंडल्या च्या वेळी काढले.
मातृशक्ती, पुणे यांनी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर महा भोंडल्याचे आयोजन केले होते. नवरात्र महोत्सवात मातृशक्ती, पुणे यांजकडून पुण्यातील विविध सेवा वस्त्या, सोसायट्या, शाळा येथे भोंडल्याचे आयोजन केले होते. त्याची सांगता आजच्या महा भोंडल्यानं झाली.
या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या श्रीमती गिरीजा ओक म्हणाल्या,’ रिकामा सरफेस दिसला की त्यावर लगेच वस्तू जमा होतात.तसं बायकांचा रिकामा वेळ,हात असेल तर घरातील कामे त्या करत राहतात. स्त्रीने रिकामा वेळ उरला तर तो स्वतः साठी वापरला पाहिजे.’
स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती,स्वधर्म आणि स्वत्व जपत प्रत्येक क्षेत्रात आजची स्त्री कार्यरत आहे. गरज आहे ती एकत्रित येणे, संघटित होऊन कृती करण्याची त्यासाठी आजच्या भोंडल्याचे आयोजन आहे असे प्रतिपादन सुजाता सातव यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केले.
योगिनी टिळक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर रुपाली केंढे यांनी आभार प्रदर्शित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
त्यांनतर जमलेल्या महिलांनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हंटली.
पुणे महानगराच्या विविध भागातून 800 महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments