पुणे
(प्रतिनिधी)
“कीर्तन हे देवर्षी नारद यांनी प्रवर्तित केले असून त्यात म्हणजे कीर्तनात दहा कलांचा संगम असायला हवा.मुख्य म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची पूर्तता होणे आवश्यक आहे आणि हे काम सद्गुरू मोरेश्वर जोशी चऱ्होलीकर महाराज हे गेली पन्नास वर्षे अव्याहतपणे करीत आहेत”असे गौरवोदगार काढून ते पुढे म्हणाले कीर्तनात आणि मोरेश्वर जोशी यांच्या व्यक्तिमत्वात दहा कलांचा संगम झाला आहे या कलांमध्ये काव्य,वाद्य,नृत्य,नाट्य,गायन,ताल,पाठांतर,वक्तृत्व,बहुश्रुतता आणि शिष्टाचार यांचा समावेश आहे .हे असेल तर समाज प्रबोधन करता येणे शक्य असून त्यांनी लोकसंग्रह देखील केला आहे.
असे विद्या वाचस्पती व आदित्य प्रतिष्ठान प्रमुख डॉ शंकर अभ्यंकर यांनी काढले .
बाल शिक्षण सभागृहात राष्ट्रीय कीर्तनकार सद्गुरू मोरेश्वर जोशी चऱ्होलीकर यांचा अमृत महोत्सवी सोहळा आणि कीर्तन क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
संकेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती, रा.स्व संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ,प्रांत संघचालक नाना जाधव,कृतज्ञता सोहळा समिती अध्यक्ष वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले हे व्यासपीठावर होते.
यावेळी प्रथम कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.तसेच कृतज्ञता गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. समितीच्या वतीने आणि श्रीशंकराचार्य – श्रीसंकेश्वर पीठा कडून महावस्त्र,पगडी आणि मानपत्र प्रदान करून मोरेश्वर जोशी यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मोरेश्वर जोशी यांनी सांगितले की,आजचा गौरव हा व्यक्तीचा नाही तर संस्काराचा,कार्याचा आणि या कार्यात सहभागी असणार्या सर्वांचा आहे त्यामुळे हा सन्मान त्यांना समर्पित करतो आहे.सध्याच्या काळात आपण सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे तसेच कीर्तन हे जगता आले पाहिजे आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन देखील करण्याची सक्रियता असायला हवी.असे त्यांनी सत्काराला उत्तर देतांना नमूद केले.
नंतर श्री शंकराचार्य यांनी मोरेश्वर जोशी यांच्या आगामी कार्यासाठी आशिर्वाद दिले.
सुहास हिरेमठ यांनी मनोगतातून मोरेश्वर जोशी यांचेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार बालपणापासून झाले आहेत असे सांगून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अंजली कर्हाडकर यांनी सूत्रसंचालन केले.सुरूवातीला ईशिता जोशीने शारदास्तवन सादर केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुहास देशपांडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून जोशी दांपत्याचा तसेच कीर्तन क्षेत्रातील वाटचालीचा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आठवणीचा आणि त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याचा व समाजसेवेचा प्रवास उलगडला.वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी प्रास्ताविक केले
गीताव्रती संध्या कुलकर्णी यांनी गीतेतल्या पंधरावा अध्यायचे पठण केले.तसेच या गौरव विशेषाकांचे संपूर्ण काम प्रमोद पोटभरे यांनी केले नंतर स्मिता देशपांडे यांनी आभार मानले.जान्हवी गोखले यांच्या पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.
कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व धर्म संस्कृती जागरणाचे काम सद्गुरू कीर्तनकार मोरेश्वर जोशी यांनी केले …………विद्यावाचस्पती डॉ शंकर अभ्यंकर
RELATED ARTICLES


