Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसृजन - दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन

सृजन – दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन

रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट हि संस्था ५५ वर्ष पासून समाजकार्यात कार्यरत असून समाजातील वंचीत लोकांसाठी विविध क्षेत्रात कार्य करीत आहे ।
रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट तर्फे “सृजन” नावाने २००५ पासून दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजितकरण्यात येते।
दर वर्षी प्रमाणे या वर्षी हे प्रदर्शन 19 व 20 ऑक्टोबर 2024 रोजी अंबर हॉल , कर्वे रोड , कोथरूड , पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे।
या मध्ये दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या विविध कलात्मक वस्तू व दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे। राज्याच्या विविध भागातील १५ ते २० संस्था यात सहभागी होतात।
हे प्रदर्शन सर्वां साठी दि 19 ऑक्टोबर ला दुपारी ३ ते रात्री ८ व दि 20 ऑक्टोबर ला सकाळी १० ते रात्री ८ वाजे पर्यंत खुले राहणार आहे । प्रदर्शनाचे संपूर्ण खर्च रोटरी क्लब तर्फे करण्यात येतो व विक्री चे उत्पन्न सर्व संबंधित संस्थांना देण्यात येतो।
रोटरी तर्फे अश्या संस्थांना व दिव्यांग मुलांची आर्थिक सुधारणा होईल या करिता रोटरी सतत प्रयन्तशील असते ।
तरी आपणास विनंती करण्यात येते कि आपण आकाशवाणी च्या माध्यमातून सृजन – विक्री व प्रदर्शन ला प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे जेणे करून पुण्यातील लोक मोठ्या संख्येने सृजन ला भेट देऊन व खरेदी करून दिव्यांग व त्यांच्या संस्थांना मदद करतील, अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments