Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवसरी येथे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

अवसरी येथे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

*

पुणे, दि. २१ : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन अवसरी येथे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय नागटिळक, तहसीलदार प्रमिला वाळुंज, गटविकास अधिकारी सुरेश पठाडे आदी उपस्थित होते.

आपापल्या क्षेत्रातील मतदान केंद्रावर होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) संदर्भातील अडचणी व त्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मतदान केंद्रांची रचना १ हजार ५०० पेक्षा जास्त मतदार नसतील अशी केली आहे. मतदान केंद्राबाबतच्या नियमावलींची देखील त्यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली. संबंधित मतदान अधिकारी त्यांचे कर्तव्य सुरळीत पार पाडत असल्याची खात्री क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना वारंवार भेटी देवून करावी, अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments