Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआयच्या युगात मानवी विवेकबुद्धी आणि कौशल्यांचेच मोल सर्वाधिक : डॉ. प्रमोद कुमार...

एआयच्या युगात मानवी विवेकबुद्धी आणि कौशल्यांचेच मोल सर्वाधिक : डॉ. प्रमोद कुमार आयएसबी अँड एम पुणे येथे 26 वी ‘एचआर शेअर 2o26’ परिषद उत्साहात संपन्न; देश-विदेशातील दिग्गज एचआर प्रमुखांचे मार्गदर्शन

 

 

पुणे दि २३: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनमुळे उद्योगांमधील नियमित व साचेबद्ध नोकऱ्या कमी होत असल्या, तरी मानवी विवेकबुद्धी, धोरणात्मक विचार आणि विशेष कौशल्यांचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. यापुढे कंपनीमध्ये मशीन आणि माणूस एकत्र काम करतील, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियाचे (आयएसबी अँड एम) संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार यांनी केले.

 

पुणे येथील ‘आयएसबी अँड एम’ संस्थेच्या एचआर क्लबतर्फे दोन दिवसीय वार्षिक ‘एचआर शेअर २०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 2001 पासून सुरू असलेल्या या परिषदेचे यंदाचे २६ वे वर्ष होते. ‘फ्रॉम जनरेशनल टू टेक्नॉलॉजी ट्रान्झिशन – इमर्जिंग कॉम्प्लेक्सिटी इन द टॅलेंट लँडस्केप’ अशी यंदाच्या परिषदेची मुख्य संकल्पना होती. परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योगांचे भविष्य आणि ऑटोमेशन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

 

नवीन आणि जुन्या पिढीचा समन्वय आवश्यक

 

 

परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘पिढीतील विविधता आणि एचआरचे भविष्य’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. ज्येष्ठ पिढीचा व्यावसायिक अनुभव आणि नवीन पिढीचे (जेन झी) तांत्रिक ज्ञान यांचा योग्य समन्वय साधून कंपन्यांनी कामकाजाची नवी संस्कृती घडवायला हवी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. जीसेक अँड डेव्ह्रिएंटचे एचआर प्रमुख रोहित मोगरा यांनी पदव्यांपेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व असल्याचे अधोरेखित केले.

 

एआयमुळे कामाचे स्वरूप बदलणार

 

 

दुसऱ्या दिवशी ‘एआय-आधारित कार्यस्थळ : ऑटोमेशन, ऑगमेंटेशन आणि जॉब रिडिझाइन’ या विषयावर मंथन झाले. बिगमिनटच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) मनीषा केशरी यांनी बीजभाषण केले. त्या म्हणाल्या की, “जी गोष्ट सर्वसामान्य होते, तिचे मूल्य कमी होते आणि जी दुर्मीळ असते, तिचे मूल्य वाढते. तंत्रज्ञानाच्या युगात मानवी निर्णयक्षमता आणि विवेकबुद्धी हेच सर्वात मोठे भांडवल ठरेल.” समारोप सत्रात इंटेग्रिस हेल्थचे सीएचआरओ आशिष मुसद्दी यांनी मार्गदर्शन केले.

 

—

 

कंपन्यांमध्ये ‘मशीन आणि माणूस’ एकत्र काम करतील – डॉ. प्रमोद कुमार

 

 

पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. प्रमोद कुमार यांनी बदलत्या रोजगार क्षेत्राचे विश्लेषण केले. ते म्हणाले की, येत्या काळात कंपन्यांमधील 50 ते 60 टक्के नियमित कामे एआय एजंट्स करतील. मात्र, यामुळे व्यवस्थापकीय, धोरणात्मक आणि विक्री व्यवस्थापनातील (सेल्स मॅनेजमेंट) नोकऱ्यांना कोणताही धोका नाही. उलट या पदांवरील व्यक्तींचे पगार आणि जबाबदारी वाढेल. केवळ एकाच जागी बसून काम करणाऱ्या आणि कौशल्य अद्ययावत न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान असेल. तसेच एकाकी कामाच्या वातावरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही कंपन्यांसाठी मोठी जबाबदारी ठरणार आहे.”

 

परिषदेत सहभागी झालेले प्रमुख मान्यवर

 

दोन दिवसांच्या या परिषदेत जेपी मॉर्गन चेस, डीएचएल ग्लोबल, प्रेस्टिज ग्रुप, एमआरएफ, सीमेन्स हेल्थिनियर्स, टेक्निप एनर्जीज, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज, हिंडवेअर, बीएनवाय मेलन, व्होल्वो आयशर, अदानी विल्मार, आयडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि डेलॉइट यांसारख्या नामवंत कंपन्यांचे २३ हून अधिक एचआर प्रमुख आणि उपाध्यक्ष सहभागी झाले होते. यामध्ये रॉय जोसेफ, अजय कृष्णनकुट्टी, रमेश तिवारी, रणजित कोंडेशन, शेरॉन मेरी, रोहिणी कुमार आणि सुनील नायक यांनी पॅनेल चर्चेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments