Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorized३१वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आज पासून विश्वशांती केंद्र (आळंदी),...

३१वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आज पासून विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजन (२४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत विविध क्षेत्रातील वक्त्यांची व्याख्याने)

 

 

पुणे, दि.२३ नोव्हेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत दि. २४ ते दि. ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ३१वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होईल. तसेच ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. अशी माहिती पीस स्टडीते सह अधिष्ठाता व व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. मिलिंद पात्रे यांनी दिली.

व्याख्यानमालेचे उद्घाटन दि. २४ नोव्हेंबर रोजी सायं ४.०० वा. होईल. या समारंभासाठी भारत सरकारच्या आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच, पद्मश्री व्हेन. प्रा. गेशे ड.वांग सामटेन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड हे उपस्थित राहणार आहेत.

व्याख्यानमालेचा समारोप सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी स. ११.०० वा. होईल. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर प्रमुख पाहुणे असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थान भूषवतील.

२५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सायं. ४.०० वा. होणार्‍या व्याख्यानमालेत यूएसएच्या पुर्डू विद्यापीठाचे प्रा. डॉ. मकरंद हस्तक (निर्मित पर्यावरणाची जटिलता आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये यूएन एसडीजीचे योगदान), डीईएस पुणे विद्यापीठाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर लोकमान्यांचे गीतारहस्य), भारतीय नौसेनेचे सहसंचालक व माजी कमांडर शिव माथूर (एक आध्यात्मिक शोध), निंबकर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. अनिल राजवंशी (आध्यात्मिकतेने मार्गदर्शित तंत्रज्ञान एक शाश्वत आणि सुखी जग निर्माण करू शकते) आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे कार्याध्यक्ष डॉ.सुनिल देवधर (फिल्मी गीतोंमे अध्यात्म और दर्शन )अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

 

 

 

या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होणार आहे. या मध्ये प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, श्री. आनंद बापट, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू प्रा. डॉ. रविराजा एन. सीथाराम, प्रा. डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विख्यात सर्जन डॉ. उत्कांंंत कुर्लेकर, डब्ल्यूपीयूच्या सेंट्रर फॉर डिजिटल लर्नींगचे एसो डायरेक्टर सागर कुंभारे हे विविध विषयांवर विचार मांडतील.

प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत डब्ल्यूपीयूचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी स. ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचे आयोजन क्रीडा विभागाचे संचालक अभय वाघ व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या योगा विभागाचे संचालक डॉ. गणेश प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.

या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे.

ही व्याख्यानमाला विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या प्रेरणेने तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे व माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments