*
पुणे, दि. २३: जिल्ह्यातील २१३-हडपसर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून उमेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती हडपसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी दिली आहे.
श्री. उमेश कुमार यांचा निवासाचा पत्ता खोली क्रमांक ए- १०५ , हरित इमारत, व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ७७६८०३६२३० हा आहे. त्यांचा ईमेल आयडी umeshnoba@gov.in आहे. त्यांचे संपर्क अधिकारी सुहास विसपुते (९०११०२७१८७) हे आहेत असे हडपसर विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
0000


