Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक खर्च निरीक्षक पदी उमेश कुमार यांची नियुक्ती*

*पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक खर्च निरीक्षक पदी उमेश कुमार यांची नियुक्ती*

पुणे, दि. २३: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून उमेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

उमेश कुमार यांच्या निवासाचा पत्ता खोली क्र. नंबर ए-१०५, हरित इमारत, व्हीव्हीआयपी विश्राम गृह, क्वीन्स गार्डन, पुणे असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ७७६८०३६२३० असा असून ईमेल आयडी expobs34pune@gmail.com आहे. त्यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ असून त्यांचे संपर्क अधिकारी सुहास विसपुते (संपर्क भ्रमणध्वनी क्र. ९०११०२७१८७) हे आहेत.

श्री.उमेश कुमार यांनी आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयास भेट दिली. यावेळी श्री. कुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडून निवडणुकीसाठी स्थापन सर्व कक्षांच्या कामकाजाची माहिती घेऊन त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना दिल्या. मतदारसंघातील मतदारांच्या काही तक्रारी असल्यास सी-व्हीजिल ॲप वर नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुनंदा भोसले, निवडणूक नायब तहदिलदार चित्रा ननावरे, निवडणूक खर्च समन्वय अधिकारी कमलकिशोर राठी, सहायक खर्च निरीक्षक विनोद शिंदे व मधुकांत प्रसाद, आचार संहिता कक्ष समन्वयक अधिकारी धनश्री नलावडे, निवडणूक खर्च निरीक्षक यांचे मुख्य समन्वयक सुहास विसपुते व सहायक संपर्क अधिकारी संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments