Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांची चिंचवड निवडणूक कार्यालयास भेट*

निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांची चिंचवड निवडणूक कार्यालयास भेट*

*

पुणे, दि. २६: भारत निवडणूक आयोगाकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून प्रेम प्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाचा कामाचा आढावा घेतला, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी कळविले आहे.

श्री. मीना यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापन संबंधित सर्व कक्षांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच विविध नमूने संबंधित खर्च व्यवस्थापन कक्षाकडे नियमित जातील याची दक्षता घ्यावी असे सर्व कक्षांना निर्देश दिले. यावेळी समन्वय अधिकारी, भरारी पथक, सी-व्हीजिल, आदर्श आचार संहिता कक्ष, एक खिडकी परवाना कक्ष यांना निवडणूक खर्च व्यवस्थापन व नमूने याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, सहायक निवडणूक अधिकारी अमोल कदम, निवडणूक खर्च सहायक नोडल अधिकारी अश्विनी मुसळे, निवडणूक खर्च समन्वय अधिकारी शिवाजी ठोंबरे, सहायक निवडणूक खर्च निरीक्षक रमेश फडतरे, पवनकुमार यादव, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सचिन चाटे, सुरेंद्र देशमुखे, आचारसंहिता समन्वयक राजेंद्र डुंबरे, माध्यम कक्ष समन्वयक किशोर ननवरे हे उपस्थित होते.

श्री. प्रेम प्रकाश मीना यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, हरीत इमारत, , क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०३ असा असून भ्रमणध्वनी क्रमांक ९०२१५१३४४५ असा आहे. दूरध्वनी ०२०-२९७८००४३⁠ असून ईमेल आयडी expobs.pcmb@gmail.com असा आहे.
श्री. मीना हे सकाळी १० ते १२ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटीकरीता उपलब्ध असतील, अशी माहिती चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments