Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुन्नर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणाबाबतची माहिती निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक- निवडणूक...

जुन्नर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणाबाबतची माहिती निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक- निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे

**

पुणे,दि.२४: जुन्नर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत मुद्रणालयामध्ये निवडणूक विषयक कोणत्याही प्रकारचे मुद्रण होत असल्यास त्याची माहिती मुद्रणालय चालकाने निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे म्हणाल्या.

जुन्नर पंचायत समिती कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मुद्रणालय चालक व प्रकाशकांसमवेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

श्रीमती घाडगे म्हणाल्या, विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जी बंधने घातलेली आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे.

या आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ कलम १२७ (क) नुसार कोणतीही व्यक्ती मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद केल्याशिवाय आणि दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र प्रकाशकाकडून घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पत्रके, भित्तीपत्रक, हस्तपत्रके किंवा अन्य कागदपत्रांचे मुद्रण करणार नाही, प्रकाशित करणार नाही किंवा मुद्रण करण्याची अथवा प्रकाशित करण्याची व्यवस्था करणार नाही.

कागदपत्रांच्या मुद्रणानंतर वाजवी वेळेत कागदपत्रांच्या प्रतीसह प्रतिज्ञापत्राची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्याची जबाबदारी अशा मुद्रणालयाची आहे, असेही श्रीमती घाडगे म्हणाल्या.

**

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments