Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास निवडणूक निरीक्षक व खर्च निरीक्षकांची भेट

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास निवडणूक निरीक्षक व खर्च निरीक्षकांची भेट

**

पुणे, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाकडून 212 पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुमार यांची तर खर्च निरीक्षक म्हणून उमेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.

निवडणूक निरीक्षक श्री. संजीव कुमार आणि खर्च निरीक्षक श्री. उमेश कुमार यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील नामनिर्देशन प्रक्रियेची पाहणी करून समन्वय अधिकारी यांच्याकडून निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघात स्थापन केलेल्या सर्व कक्षांची पाहणी करून कक्षनिहाय भेट देवून माहितीदेखील घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments