*
पुणे, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाकडून 212 पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.
श्री. संजीव कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह कक्ष, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-304 असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9226811996 असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ सोमवार ते बुधवार या कालावधीत सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत आहे. निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी दिग्विजय आहेर हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9921252599 असा आहे, अशी माहिती श्री. खैरनार यांनी दिली आहे.
००००


