Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड' मोहिमेच्‍या २०२४ एडिशनची घोषणा

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिमेच्‍या २०२४ एडिशनची घोषणा

गुरूग्राम । नोव्‍हेंबर १४, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) या भारतातील स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने ग्राहक-केंद्रित उपक्रम ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिमेच्‍या २०२४ एडिशनची घोषणा केली आहे. या मोहिमेचा मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याचा मनसुबा आहे. हा एक-दिवसीय देशव्‍यापी ग्राहक आऊटरिच उपक्रम विद्यमान व संभाव्‍य ग्राहकांसाठी रविवार १७ नोव्‍हेंबर २०२४ रोजी आयोजित करण्‍यात आला आहे.

या अद्वितीय ग्राहक-केंद्रित उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलचे पूर्ण-वेळ संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्‍ये ग्राहक-केंद्रित्व मुलभूत मूल्‍य आहे आणि ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिम याच उद्देशाचा परिणाम आहे. या अद्वितीय उपक्रमाचा विनासायास अनुभव देत, विश्‍वास निर्माण करत आणि ग्राहकांसोबत दीर्घकालीन संबंधांना चालना देत ग्राहक सहभाग वाढवण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमामधून आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो, ज्‍यामधून अद्वितीय सोयीसुविधा देण्‍यासोबत आमचे अद्वितीय ब्रँड तत्त्‍व अधिक दृढ होते.”

ग्राहक त्‍यांच्‍या जुन्‍या कारचे मूल्‍यांकन करत जवळच्‍या कॅम्‍पमध्‍ये नवीन ह्युंदाई वेईकल बुक करू शकतात. कुशल ह्युंदाई टेक्निशियन्‍स ग्राहकांना आगामी सर्विस गरजांबाबत सल्‍ला देतील, ज्‍या कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी १८-पॉइण्‍ट तपासणीनंतर त्‍यांच्‍या ह्युंदाई वेईकल्‍ससाठी सानुकूल करण्‍यात आल्‍या आहेत.

विद्यमान व संभाव्‍य ग्राहक ह्युंदाई पोर्टफोलिओमधील विविध वेईकल्‍सच्‍या टेस्‍ट ड्राइव्‍ह्ज घेऊ शकतात. विविध सहभागात्‍मक क्रियाकलाप देखील डिझाइन करण्‍यात आले आहेत, जेथे ग्राहकांना अॅक्‍सेसरीजवर २० टक्‍के सूट, मोफत कार वॉश, व्‍हील अलाइनमेंट व बॅलन्सिंगवर ५० टक्‍के सूट, पीएमएस लेबर बिलिंगवर २० टक्‍के सूट, इंटीरिअरची साफसफाई व एक्‍स्‍टीरिअर सुधारणेवर ३० टक्‍के सूट जिंकण्‍याची संधी आहे. याव्‍यतिरिक्‍त जवळपास १०,००० रूपये किमतीचे अॅक्‍सेसरीज (निवडक मॉडेल्‍ससाठी वैध) जिंकण्‍याच्‍या संधीसाठी स्‍क्रॅच कार्ड्स आहेत. तसेच, मायह्युंदाई अॅप डाऊनलोड केल्‍यानंतर ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्स आहेत. ग्राहक अधिक माहितीसाठी त्‍यांच्‍या जवळच्‍या ह्युंदाई डिलरशिपशी संपर्क साधू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments