Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन*

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन*

*

पुणे, दि. १४: मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सॲपवर तसेच समाज माध्यमांवर पसरविला जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून मतदारांनी सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

“मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून फॉर्म क्रमांक १७ भरावा. मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रिया करावी”, असा चुकीचा दिशाभूल करणारा संदेश भ्रमणध्वनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. मात्र फॉर्म क्रमांक १७ हा दहावी बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असतो. तर मतदार यादी मध्ये नाव नोंदणीसाठी फॉर्म क्र. ६ असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही फॉर्मद्वारे मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नाही. तरी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments