Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंदापूर विधानसभा मतदार संघात मतदार ओेळख चिठ्ठ्यांचे वितरण सुरु*

इंदापूर विधानसभा मतदार संघात मतदार ओेळख चिठ्ठ्यांचे वितरण सुरु*

*

पुणे, दि. १४ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) मार्फत मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वाटप सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली.

विधानसभा मतदारसंघात एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ४८५ मतदार असून ३३७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांच्या बीएलओ मार्फत मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. या मतदार ओळख चिठ्ठीवर मतदाराची माहिती, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदानाची तारीख व वेळ यांचा समावेश आहे.

मतदारांची मतदान केंद्र व अनुक्रमांक शोधण्याची ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रशासनाने मतदार संघात १२ पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली मतदानापूर्वीच मतदार ओळख चिठ्ठ्या घरपोच करण्याची कार्यवाही एकूण ३३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत सुरु आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार जीवन बनसोडे कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments