Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ .प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ मानांकन राज्य टेबल टेनिस स्पर्धा. पुण्याच्या अजेय...

डॉ .प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ मानांकन राज्य टेबल टेनिस स्पर्धा. पुण्याच्या अजेय कोठावळे यांना विजेतेपदाचा मान

पुणे दि. १७
अजय कोठावळे या सहाव्या मानांकित खेळाडूंनी अंतिम फेरीत मुंबई उपनगर जिल्हा संघाच्या कपिल कुमार यांचा पराभव केला
आणि डॉ .प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ मानांकन राज्य टेबल टेनिस स्पर्धेतील ५९ वर्षावरील गटात विजेतेपद पटकाविले.

महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा पीवायसी जिमखाना यांनी आयोजित केली होती. कोठावळे यांनी अंतिम सामन्यात कपिल कुमार यांच्यावर १३-११, ११-९,११-९ असा सरळ तीन गेम्स मध्ये विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्यांनी पुण्याच्याच पराग जुवेकर यांचे आव्हान ३-० असे संपुष्टात आणले होते तर कपिल कुमार यांनी विदुर पेंढारकर यांच्यावर ३-० असा विजय मिळवला होता.

स्पर्धेतील ६४ वर्षांवरील गटात मुंबई महानगर जिल्हा संघाचे तृतीय मानांकित खेळाडू प्रकाश पंजाबी विजेते ठरले त्यांनी अंतिम सामन्यात आपले सहकारी व अग्रमानांकित खेळाडू जयंत कुलकर्णी यांना पराभूत करीत आश्चर्याचा धक्का दिला. चुरशीने झालेला हा सामना त्यांनी १३-११,११-६,१०-१२, १०-१२,११-४ असा जिंकला. उपांत्य फेरीत त्यांनी हरीश साळवी या पुण्याच्या खेळाडूंना ३-० असे हरविले होते तर कुलकर्णी यांनी अविनाश जोशी यांचे आव्हान ३-० असे संपुष्टात आणले होते.

पुरुषांच्या ४९ वर्षावरील गटात मुंबई उपनगर संघाचे अमित श्रॉफ यांनी विजेतेपद मिळवताना अग्रमानांकित खेळाडू प्रसाद नाईक (मुंबई महानगर जिल्हा संघ) यांच्यावर मात केली हा सामना त्यांनी ९-११,११-८, १२-१०, ११-८ असा जिंकला. उपांत्य फेरी त्यांनी अनंत कुलकर्णी यांना ३-१ असे हरविले होते तर नाईक यांनी सचिन दारवटकर या पुण्याच्या खेळाडूंना ३-१ असे पराभूत केले.

स्पर्धेतील ३९ वर्षावरील गटात मुंबई महानगर संघाचे केदार कसबेकर विजेतेपदाचे मानकरी ठरले त्यांनी अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाच्या सुहास राणे यांचा ६-११,१०-१२, ११-८, ११-८,११-९ असा अटीतटीच्या लढतीनंतर पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांनी पुण्याच्या आदित्य गर्दे यांना ३-० असे हरवले होते तर राणे यांनी संतोष वा कराडकर यांचा ३-२ असा पराभव केला होता.

सांघिक विभागातील स्मार्ट गटात टॉस अकादमी यांनी विजेतेपद मिळवले अंतिम सामन्यात त्यांनी डेक्कन ‘अ’ संघाचा ३-० असा पराभव केला त्यावेळी त्यांच्याकडून संतोष वाकराडकर, ओंकार जोग व कृपाल देशपांडे यांनी एकेरीचा प्रत्येकी एक सामना जिंकला. क्लेव्हर विभागात डेक्कन स्मॅशर्स संघ विजेता ठरला. अंतिम लढतीत त्यांनी टीम फोरझा संघाला ३-२ असे पराभूत केले. त्यावेळी विजयी संघाकडून अजेय कोठावळे व पराग जुवेकर यांनी शानदार कामगिरी केली. पराभूत संघाकडून जयंत कुलकर्णी यांनी एकेरीचे दोन्ही सामने जिंकून एकाकी लढत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments