Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचा सन्मान इंग्लंड मध्ये विविध ठिकाणी कीर्तन व...

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचा सन्मान इंग्लंड मध्ये विविध ठिकाणी कीर्तन व नाट्यसंगीत सादरीकरणानिमित्त सन्मान

पुणे ः राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी नारदीय कीर्तन परंपरेच्या शैलीमध्ये अनेक विषयांवर कीर्तन करून युके मधील मराठी व हिंदी भाषेतील रसिकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तन म्हणजे काय, ते समाज प्रबोधनासाठी आजही किती प्रभावी माध्यम याचे मार्गदर्शन केले. परदेशातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंद स्वामी आफळे व कै. सौ. सुधा गोविंद आफळे यांच्या स्मृती निमित्त सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे भागवत दर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनकार बाळकृष्ण लक्ष्मणराव चोथवे (नांदेड) यांच्या हस्ते चारुदत्तबुवा आफळे यांचा सन्मान करण्यात आला.

चारुदत्त आफळे यांनी युके मधील महाराष्ट्र मंडळ लंडन येथे शिवाजी महाराज व त्यांचे चरित्र , क्रॉयडन मराठी सर्कल येथे शक्ती गाथा, रिडींग हिंदू टेम्पल येथे हिंदी भाषेत भगवान श्रीकृष्णलीले बद्दल सांगितले. साईबाबा मंदिर मिल्टन किन्स येथे श्रीराम कथा सांगून रामाचे व्यक्तिमत्व यावर ते कसे समाज हितासाठीच होते हे सांगितले , मराठी मंडळ केंट येथे भारतीय संस्कृतीची विजय गाथा, मराठी कॉव्हेंट्री येथे संतांच्या शिकवणुकीतून बोध घेऊन आजच्या काळात पालकत्व कसे असावे यावर कीर्तन, स्लाव्ह मित्र मंडळ येथे आद्य शंकराचार्य ते विवेकानंद असे सनातन संस्कृती बद्दल मार्गदर्शन केले, हिंदू नेटवर्क वॉरिंग्टन येथे महाराष्टातील संत आणि भगवंत , इप्सविच मित्र मंडळ कोलचेस्टर व चेम्सफर्ड मंडळ येथे चारुदत्त आफळे यांनी “हेचि दान देगा देवा ” हा तुकारामांचा अभंग घेऊन महाभारतातील पांडवांचा दाखला देत ईश्वराच्या नित्य स्मरणाचे महत्व सांगून मंत्रमुग्ध केले .

तर पुढे त्यांनी चीजलहर्स्ट येथे संगीत नाटक, त्याचा इतिहास व सुंदर गीतांचे सादरीकरण करीत नाट्य संगीत मैफली रंगवली. लंडन मधील पूर्णवादाचार्य डॉ रामचंद्र पारनेरकर महाराज यांचे मंदिर तसेच रेणुका माता उपासक प.पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी यांचे पादुका स्थान असलेल्या ठिकाणी भक्तीसंगीताचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या दरम्यान रामकृष्ण करंबेळकर (तबला) आणि हर्षल काटदरे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. ४०० वर्षांची परंपरा असलेले श्री आफळे बुवा यांच्या कीर्तन आणि संगीत महोत्सव या युके मधील ऐतिहासिक दौऱ्याचे संपूर्ण आयोजन हृषीकेश व प्राची घोटणकर लंडन यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments